Low Budget Business Ideas: फक्त 35,000 रुपयांमध्ये सुरू करा ‘हा’ व्यवसाय; कमी वेळात मिळेल जास्त नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्ही अशा व्यवसायाच्या (Low Budget Business Ideas) शोधात असाल ज्यातून तुम्हाला कमी वेळात आणि कमी गुंतवणुकीत जास्त नफा कमवायचा असेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आजच्या युगात, प्रत्येकजण अधिक कमाई करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो. परंतु व्यवसायातील जोखीम आणि जास्त खर्चामुळे लोक ते सुरू करू शकत नाहीत. पण आज आम्ही अशी एक बिझनेस आयडिया आणली आहे, ती सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 35,000 रुपये खर्च करावे लागतील. आता तुम्ही विचार करत असाल की एवढ्या कमी बजेटमध्ये कोणता व्यवसाय (Low Budget Business Ideas) सुरू केला जाऊ शकतो आणि त्यातून चांगले उत्पन्नही मिळेल. होय, आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे ‘तांदूळ प्रक्रिया उद्योग’ (Rice Processing).

कमी गुंतवणुकीत सुरू करता येणाऱ्या या व्यवसायाला सरकारकडून आर्थिक मदतही केली जाते. जाणून घेऊ या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती.

तांदूळ प्रक्रिया युनिटसाठी महत्त्वाची माहिती

हा व्यवसाय (Low Budget Business Ideas) सुरु करण्यासाठी 1000 चौरस फूट शेड असणे आवश्यक आहे. या व्यवसायात खालीलप्रमाणे मशिनरी (Rice Processing Business Machinery) किंवा प्रक्रिया युनिट वापरतात

  • डस्ट बॉलरसह धान क्लीनर
  • पॅडी सेपरेटर/तांदूळ विभाजक
  • तांदूळ डी-हस्कर
  • तांदूळ पॉलिशर
  • कोंडा प्रक्रिया
  • एक्सपायरेटर

तांदूळ प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी किती खर्च येईल? (Rice Processing Business Expenditure)

एक प्रोसेसिंग युनिट (Low Budget Business Ideas) उभारण्यासाठी किमान 3 लाख रुपये खर्च येतो. याशिवाय अंदाजे 50 हजार रुपये खेळते भांडवल म्हणून ठेवावे लागतील. एकूणच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च येतो. पण त्याचबरोबर या व्यवसायासाठी सरकारी मदत घेतल्यास सुमारे 90 टक्के अनुदान दिले जाते.

व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवायचे (Business Loan)

तुम्हाला तुमचा व्यवसाय (Low Budget Business Ideas) सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असल्यास, तुम्ही पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PEGP) अंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. तुम्हाला तुमच्या बाजूने फक्त 35 हजार रुपये गुंतवावे लागतील. सरकारच्या मदतीने तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता.

या व्यवसायातील कमाई (Business Profit)

या व्यवसायातील नफा तुमच्यावर अवलंबून आहे, जसे की तुम्ही 370 क्विंटल तांदळावर प्रक्रिया केली तर त्याच्या उत्पादनाची किंमत सुमारे 4.45 लाख रुपये असेल. जर तुम्ही हे सर्व प्रक्रिया उत्पादन विकले  तुमची एकूण विक्री सुमारे 5.54 लाख रुपये होईल. अशा परिस्थितीत जर हिशोब केला तर तुम्ही 1 लाख रुपयांहून अधिक सहज कमवू शकता.