Maharashtra Budget 2024: शेती आणि शेतकर्‍यांसाठी काय आहे अर्थ संकल्पात? जाणून घ्या सविस्तर!   

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) अर्थमंत्री (Finance Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मांडला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी (Agriculture Sector) काय वेगवेगळ्या योजना (Maharashtra Budget 2024) आणि घोषणा झाल्या आहेत ते जाणून घ्या.

शेती आणि शेतकर्‍यांसाठी अर्थसंकल्पातील घोषणा (Maharashtra Budget 2024)

  • नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पीक नुकसानीसाठी जुलै, 2022 पासून 15 हजार 245 कोटी 76 लाख रूपयांची मदत
  • नोव्हेंबर – डिसेंबर, 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24 लाख 47 हजार शेतकर्‍यांना 2 हजार 253 कोटी रूपयांची मदत
  • नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत
  • खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1 हजार 21 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू
  • नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत (Maharashtra Budget 2024) एकूण 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान
  • ‘एक रुपयात पीक विमा योजने’ अंतर्गत 59 लाख 57 हजार शेतकर्‍यांना 3 हजार 504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा
  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’ अंतर्गत 2 हजार 694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रूपयांचे अनुदान वाटप
  • ‘महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’ (Maharashtra Budget 2024) अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14 लाख 33 हजार शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5 हजार 190 कोटी रुपये अदा केले, उर्वरित रकमेचे वाटप त्वरीत होणार
  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (Maharashtra Budget 2024) 6 हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांत राबवण्यात येणार
  • मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत 1 हजार 561 कोटी 64 लाख  रुपये किमतीच्या 767 उपप्रकल्पांना मंजूरी- सुमारे 9 लाख शेतकर्‍यांना लाभ
  • विदर्भ आणि मराठवाडयातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक 11 लाख 85 हजार शेतकरी लाभार्थींना मे 2024 अखेर 113 कोटी 36 लाख रुपये थेट रोख रक्कम अदा
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात 2 लाख 14 हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 1 हजार 239 कोटी  रुपये अनुदान
  • गाव तिथं गोदाम’ या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरूस्ती
  • कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेल बियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना-सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी (Maharashtra Budget 2024)
  • आधारभूत किंमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी 100 कोटी रूपयांचा फिरता निधी
  • खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रूपयांचे अर्थसहाय्य
  • कांदा उत्पादक शेतकर्‍यांना सन 2023-24 मध्ये 350 रुपये प्रति क्लिंटनप्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान (Maharashtra Budget 2024)
  • कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रूपयांचा फिरता निधी
  • खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादक शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी 20 हजार रूपयांप्रमाणे 1 हजार 350 कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान
  • नोंदणीकृत 2 लाख 93 हजार  दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रूपयांप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरीत, राहिलेले  अनुदानही त्वरित वितरीत करणार
  • दूध उत्पादक शेतकर्‍यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर पाच रूपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै, 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार (Maharashtra Budget 2024)
  • पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन ‘दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प’
  • शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प
  • मत्स्यबाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांसाठी  50 कोटी रुपये निधी
  • अटल बांबू समृद्धी योजनेतून 10 हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड -प्रतिरोपासाठी 175 रूपये अनुदान
  • राज्यातील पडीक जमिनीवर मोठया प्रमाणात बांबूची लागवड – नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड
  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास नुकसान भरपाई
  • पिकांची नुकसान भरपाई देय रक्कम कमाल मर्यादा 50 हजार रुपये
  • सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम
  • कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने तीन हजार 200 कोटी रुपये किंमतीचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम
  • जलयुक्त शिवार अभियान-2 अंतर्गत  मार्च 2024 अखेर 49 हजार 651 कामे पूर्ण – 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
  • ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत एकूण 338 जलाशयातून 83 लाख 39 हजार 818 घनमीटर गाळ काढण्यात आला. 6 हजार शेतकऱ्यांना लाभ (Maharashtra Budget 2024)
  • शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प -एकूण 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार (Maharashtra Budget 2024)

हे सुद्धा वाचा महायुती सरकारचं अंतरिम बजेट सादर; जाणून घ्या महत्त्वाच्या घोषणा आणि मुद्दे!

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.