2021 मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक अनुभवला निसर्गाचा लहरीपणा , 340 जणांनी गमावले प्राण : IMDची माहिती

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 2021 या वर्षात हवामानाचा सर्वाधिक विपरीत परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. मुख्यतः अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज पडणे, चक्रीवादळ आणि शीतलहरींच्या घटनांमुळे 340 हून अधिक मृत्यू झाल्याचा दावा केला गेला आहे. अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात सध्या नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे. मात्र दोन ते तीन अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

राज्यात सकाळी थंडी, धुके तर दुपारी ढगाळ हवामान असं चित्र अनुभवायला मिळत आहे विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत तर राज्यात थंडी देखील कमी अधिक होत आहे. आज पासून म्हणजेच दिनांक 15 पासून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात पाऊस उघडीप देणार असून मुख्यता: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्याची शक्यता आहे.

उत्तरेत अद्यापही थंडीची लाट कायम
हिमालय पर्वत आणि परिसरावर होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात गारठा वाढला आहे आज उत्तर प्रदेशात थंडीची लाट कायम राहणार असून मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, हरीयाना, चंदीगड मध्ये पुढील दोन ते तीन दिवस थंड दिवस अनुभवायला मिळणार आहेत. शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे देशाच्या सपाट भूभागावरील निशाण केलेत 3.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अनेक ठिकाणी दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.

विदर्भाचा विचार करता गेले काही दिवस सातत्याने विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासह काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आज मात्र विदर्भात पाऊस काहीसा विश्रांती घेण्याची शक्यता आहे.