महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरु राहणार

suger factory
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा प्रश्न निर्मण झाला आहे. हा गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरु होतो. हा हंगाम एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत चालतो. मात्र यंदाच्या वर्षी उसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अद्यापही राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील ऊस गाळपाविना रानात उभा आहे. महाराष्ट्रात अद्याप 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. राहिलेल्या या उसाचे गाळप या महिन्याच्या अखेरीस पूर्ण केले जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर 30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. जिथे अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसानंतर राज्यातील उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. ऊस गाळप हंगाम संपल्यानंतरही राज्यात सुमारे 17.5 लाख टन ऊस गाळप होण्याच्या प्रतीक्षेत आहे. राज्याच्या काही भागात यंदाचा ऊस गाळप हंगाम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहू शकतो अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरु राहणार

सध्या राज्यभरातील शेतात सध्या सुमारे 17.5 लाख टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यातील बहुतांश ऊस 31 मे पर्यंत गाळप केला जाईल. अहमदनगर आणि जालना जिल्ह्यांतील काही भागात, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप सुरु राहू शकेल असे त्यांनी सांगितले. इतर राज्यातून 129 हार्वेस्टर आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याद्वारे उसाची तोडणी सुरु आहे. एकट्या जालना जिल्ह्यात सध्या 29 हार्वेस्टर काम करत असल्याची माहिती शेखर गायकवाड यांनी दिली. राज्यात 2020-21 मध्ये 11.42 लाख हेक्‍टरवर उसाची लागवड झाली होती, परंतु यावर्षी (2021-22) हा आकडा 2.25 लाख हेक्‍टरने वाढून 13.67 लाख हेक्टर झाला आहे. गतवर्षी 1 हजार 13.31 लाख टन उसाचे गाळप झाले होते. तर यावर्षी (16 मे पर्यंत) 1 हजार 300.62 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आत्तापर्यंत गाळपात 287.31 लाख टनांची वाढ झाली आहे. राज्यात 30 हून अधिक साखर कारखाने सुरु राहू शकतात. 15 मेपर्यंत राज्यातील एकूण 199 साखर कारखान्यांपैकी 126 कारखान्यांनी या हंगामासाठी त्यांचे कामकाज बंद केले आहे. 25 मे पर्यंत हा आकडा 163 पर्यंत जाऊ शकतो. उर्वरीत 36 साखर कारखाने उसाचा साठा संपेपर्यंत काम सुरु ठेवू शकतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कोणत्या जिल्ह्यात किती ऊस शिल्लक

सध्या बीडमध्ये 4 लाख टन,
जालना 3.90 लाख टन,
अहमदनगर 3 लाख टन,
लातूर 2.42 लाख टन,
उस्मानाबाद 2.38 लाख टन,
सातारा 1 लाख टन,
नांदेड 63 लाख टन,
नांदेड येथे 63 लाख टन ऊस शिल्लक आहे.
औरंगाबादमध्ये 50,000 टन
परभणीत 30,000 टन ऊस शिल्लक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दली आहे.