Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; अनेक भागात शेतीपिकांचे नुकसान

Maharashtra Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : राज्यात मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. परतीच्या पावसाने राज्यात (Maharashtra Rain) विविध भागात जोरदार तडाखा दिला असून यामुळे काढणीला आलेल्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काढणीला आलेले सोयाबीन पीक पाण्यात गेले आहे. धुळे जिल्ह्यात देवभाने शिवारात काढणीस आलेले मका पिकाचे नुकसान झाले आहे.

राज्यात (Maharashtra Rain) मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात आज (दि. 26) पालघर व नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांत (यलो अलर्ट) जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
बीड, परभणी, बुलडाणा, अमरावती, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत (यलो अलर्ट) विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून दिला आहे.

उजनी धरणातून 30 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग

काल पावसाचा जोर वाढल्यामुळे संध्याकाळी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. संततधार पावसामुळे मांजरा धरण पूर्ण भरलं असून धरणाच्या दोन दरवाजातून 1 हजार 730 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

वाशीम जिल्ह्यातही मालेगांव, मंगरुळपीर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरणही ९९ टक्क्यांहून अधिक भरलं आहे. धरणाच्या सांडव्यातून १८ दरवाजातून एकूण ९ हजार ४३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.
सोलापूरचं उजनी धरणंही पूर्ण क्षमतेनं भरलं असून, धरणातून भीमा नदीपात्रात ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो आहे.
वाशीम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. काल दिवसभर वाशीम शहरासह जिल्ह्यातल्या मालेगांव, मंगरुळपीर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.