हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाने राज्यातील (Maharashtra Weather Alert) अनेक भागासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरीमधील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील घाट भागातही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
विदर्भातील (Vidarbha Weather Update) अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज आहे. 30 ऑगस्ट रोजी गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात तसेच 31 ऑगस्ट रोजी गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची (Heavy Rainfall Prediction) शक्यता आहे (Maharashtra Weather Alert).
महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये कुठे ढगाळ तर कुठे ऊन अशी स्थिती राहणार आहे. त्यामुळे आज उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही(Maharashtra Weather Alert).
हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD) मराठवाड्यात (Marathwada Weather) 29 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तर दिनांक 30 ऑगस्ट रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तुरळक ठिकाणी तर दिनांक 31 ऑगस्ट रोजी लातूर, नांदेड, धाराशिव व बीड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात 29 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी, दिनांक 30 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 31 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून कमाल तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस वाढ होऊन त्यानंतर किंचित घट होण्याची शक्यता आहे (Maharashtra Weather Alert).
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला हवामान विभागाने दिलेला आहे.