Maize insect : खरिपातील मक्यावरील लष्करी किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. लष्करी ळी हा अमेरिकेतील मूळचा विनाशकारी कीटक आहे. या किडीमुळे भारतातील मका पिकाचे खूप आर्थिक नुकसान होत आहे. त्याचे मूळ ठिकाण अमेरिकेच्या दक्षिणेकडील फ्लोरिडा आणि टेक्सासचे प्रदेश मानले जाते. परंतु आतापर्यंत त्याचे दुष्परिणाम भारतासह ७० देशांतील किमान ८० प्रकारची पिके, भाजीपाला, फळे आणि फुलांवर पसरले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मका रिसर्च लुधियाना (IIMR) ने ही हानिकारक कीड टाळण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत.
लष्करी अळी संपूर्ण पीक नष्ट करते
IIMR लुधियानाच्या मते, लष्करी अळी मुख्यत्वे मका पिकाचे नुकसान करतात आणि मका नसताना ही कीड ज्वारीच्या पिकावर हल्ला करते. दोन्ही पिके शेतात उपलब्ध नसल्यास ऊस, भात, गहू, नाचणी या पिकांवर परिणाम होतो. त्याचबरोअबर कापूस आणि भाज्यांचे देखील नुकसान होऊ शकते. ही कीड एवढी धोकादायक आहे की जे काही पीक सापडते ते पूर्णपणे नष्ट करते. (Maize insect)
लष्करी अळी प्रादुर्भाव कसा ओळखायचा?
IIMR लुधियाना येथील तज्ज्ञांच्या मते, लष्करी अळी 100 किलोमीटरपर्यंत उड्डाण करून ते पिकांना खातात.लष्करी अळी नर पतंग शरीराच्या दोन लक्षणांवरून ओळखता येतात. या किडीच्या मागील बाजूस मध्यभागी एक पिवळा डाग असतो आणि समोरच्या पंखावर पांढरा ठिपका असतो. लष्करी अळी ची मादी एकटी तिच्या आयुष्यात 1000 पेक्षा जास्त अंडी घालते. त्यामुळे एकदा पिकांना लष्करी अळी लागली तर शेतकऱ्यांसाठी खूप चिंताजनक बाब बनते. लष्करी अळ्या हिरव्या किंवा गुलाबी, तपकिरी असतात.
लष्करी अळीचे नियंत्रण कसे करावे?
आयआयएमआर लुधियानाने लष्करी अळी नियंत्रणासाठी उपाय सुचवले आहेत. किडीचा हल्ला मक्याची उगवण झाल्यानंतर 2-4 आठवड्यांनंतर होतो आणि 5 ते 10 टक्के झाडाची लागण होते. सर्वप्रथम बीटेक २ मिली हे औषध प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. झाडातील नुकसान 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास स्पिनटार्म 11.7% SC प्रति लिटर पाण्यात 0.5 मिली औषध मिसळून फवारणी करावी.
मक्याच्या पिकावर 4 ते 7 आठवड्यांनी उगवण झाल्यानंतर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास आणि 10-20% झाडांना प्रादुर्भाव झाला असल्यास, स्पिनेटोरम 11.7% SC 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5 SC 0.4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या किडीमुळे 20% संक्रमित झाडे मक्याची उगवण झाल्यानंतर सात आठवडे आढळल्यास, स्पिनेटोरम 11.7% SC @ 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात किंवा क्लोराँट्रानिलीप्रोल 185 SC @ 0.4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अशाप्रकारे फवारणी केल्यास तुम्ही या अळीवर नियंत्रण मिळवू शकता. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मका पीकामध्ये अळीचा जास्तच प्रादुर्भाव असेल तर तुम्ही कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊ शकता.