हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळा आणि हापूस आंबा हे समीकरण फार नवीन नाही. पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी आमरस चपातीचा बेत असायचा. मात्र यंदा कोकणामध्ये हापूस आंब्याचे उत्पन्न कमी पाहायला मिळते. यंदा कोकणात फुलकीडीचा उपद्रव आंब्यावर पाहायला मिळाला. आंब्याच्या पानांच्या वरच्या बाजुला छोटे चंदेरी चट्टे पडलेले पहायला मिळाले असून त्याला सिल्वरींग म्हणतात. नंतर असेच पांढरे चट्टे मोहोरावर पण येऊ लागतात.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
फुलकिडे हे पानाच्या खालील भागात बसतात. यामुळे पानं अक्रसलेली, पिवळी, वेडीवाकडी होतात. हा प्रकार मोहोर फुटण्याच्या कालावधीत झाला असेल तर मोहर गळू शकतो किंवा करपू देखील शकतो. मोहर करपल्याने त्याचा परिणाम आंब्यावर होतो. यामुळे आंबे देखील वेडेवाकडे येतात. याचा परिणाम आंब्यांच्या उत्पादनावर होतो.
या वातावरणात फुलकिडीचा उपद्रव होण्याची शक्यता
फूलकिडीचा उपद्रव हा अधिकाधिक गरम आणि कोरड्या वातावरणात पहायला मिळतो. मात्र आद्रतेच्या वातावरणात फुळकिडीचा कोणताही परिणाम आंब्यावर होत नाही. सध्या कोकणातील हवामान हे उष्ण आणि दमट पहायला मिळते. नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये वातावरणात आद्रता पहायला मिळते.