Maza Ladka Bhau Yojana: मुख्यमंत्री ‘माझा लाडका भाऊ योजना’, बेरोजगार तरुणांसाठी आर्थिक मदत आणि कौशल्य प्रशिक्षण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र सरकारने आता ‘लाडका भाऊ’ (Maza Ladka Bhau Yojana) नावाची नवीन योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ (Mazi Ladki Bahin Yojana) योजनेच्या यशानंतर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government Scheme) आता ‘लाडका भाऊ’ नावाची नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचा (Maza Ladka Bhau Yojana) लाभ घेणाऱ्या बेरोजगार तरुणांना (Unemployed Youth) दरमहा ₹10,000 पर्यंत आर्थिक मदत आणि मोफत कौशल्य प्रशिक्षण (Free Skill Training) मिळेल.

योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे

बेरोजगारी कमी करणे: या योजनेचा (Maza Ladka Bhau Yojana) मुख्य उद्देश राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा आहे.

आर्थिक मदत: 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ₹6,000, डिप्लोमा धारकांना ₹8,000 आणि पदवीधर विद्यार्थ्यांना ₹10,000 दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

कौशल्य प्रशिक्षण: विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल ज्यामुळे त्यांना रोजगार (Employment) मिळवण्यास मदत होईल.

स्वयंरोजगार: प्रशिक्षणानंतर, विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत दिली जाईल.

पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • 12वी, डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण (passed) असणे आवश्यक आहे.
  • बेरोजगार असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • इतर आवश्यक कागदपत्रे

अर्ज कसा करावा

‘लाडका भाऊ’ योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज स्वीकारले (Accepted) जातील.

ऑनलाइन अर्जासाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि आवश्यक माहिती भरा.

ऑफलाइन अर्जासाठी, तुमच्या जिल्ह्यातील रोजगार कार्यालयात संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी:

अधिक माहितीसाठी, तुम्ही ‘लाडका भाऊ’ योजनेच्या (Maza Ladka Bhau Yojana) अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या जिल्ह्यातील रोजगार कार्यालयात संपर्क साधू शकता.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.