हॅलो कृषी ऑनलाईन: मॉन्सूनची (Monsoon Update) वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील 24 तासांत मॉन्सून केरळात (Kerala Monsoon) दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती कायम आहे. यामुळे पुढील 5 दिवसांत केरळमध्ये आणि अंदमान निकोबारमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे (Weather Update). यासोबतच अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार पृष्ठभागाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. 1 जूनला तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकमध्ये देखील पावसाचा (Monsoon Update) अंदाज आहे.
‘रेमल’ चक्रीवादळामुळे (Remal Cyclone) पोषक वातावरण तयार झाल्यामुळे मॉन्सूनचे (Monsoon Update) केरळमध्ये लवकर आगमन होत आहे. सुरुवातीला 31 मे ला मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण आता पुढील 24 तासांत मॉन्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) व्यक्त केला आहे.
सध्या मॉन्सूनला (Monsoon News)केरळमधून पुढे जाण्यासाठी परिस्थिती देखील अनुकूल होत आहे. तसेच दक्षिण अरबी समुद्राचा अधिक भाग, मालदिवचे उर्वरित भाग आणि कोमोरिन क्षेत्राचा देखील मॉन्सूनला पोषक वातावरण तयार होऊन त्याची आगेकूच वेगाने होत आहे.
मेघालयातील एकाकी ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसासह अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, केरळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Monsoon Update) आहे. यासह अरूणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय मध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम भागात देखील पावसाचा अंदाज आहे (Monsoon Update).
दरम्यान, हरियाणाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट आहे. चंदीगड-दिल्ली, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये आणि राजस्थान मध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती आहे. काल पश्चिम राजस्थानमधील चुरु येथे सर्वाधिक 50.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.