National Gopal Ratna Award 2024: राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्काराद्वारा, तुमच्या पशुधनास मिळू शकते 5 लाखापर्यंतचे बक्षीस! जाणून घ्या सविस्तर माहिती  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: दूध उत्पादक शेतकरी, (National Gopal Ratna Award 2024) दुग्ध सहकारी संस्था/एमपीसी/एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञान यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय गोकुळ मिशन (National Gokul Mission)अंतर्गत, 2021 पासून राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार (National Gopal Ratna Award 2024) प्रदान करत आहे.

मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या (Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairying) अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, (Department of Animal Husbandry and Dairying) शेतकर्‍यांना शाश्वत उपजीविका प्रदान करण्यासाठी पशुसंवर्धन (Animal Husbandry) आणि दुग्धव्यवसाय (Dairy Business) क्षेत्राच्या प्रभावी विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

भारतातील देशी गोवंशाच्या (Desi Cow Breeds) जाती मजबूत आहेत आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची अनुवांशिक क्षमता त्यांच्याकडे आहे. स्थानिक गोवंश जातींचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि विकास करण्याच्या उद्देशाने डिसेंबर 2014 मध्ये ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ सुरू करण्यात आले.

पुरस्कारांसाठी श्रेणी

  • देशी गायी/म्हशींच्या जातींचे संगोपन करणारे सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी
  • सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था
  • दूध उत्पादक कंपनी
  • शेतकरी उत्पादक संघटना (FPO)
  • सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AIT)

या वर्षापासून, विभागाने ईशान्य क्षेत्रातील राज्यांसाठी विशेष पुरस्कार समाविष्ट केला आहे जेणेकरुन ईशान्य प्रदेशातील दुग्ध विकास उपक्रमांना प्रोत्साहन आणि चालना मिळेल.

पुरस्कार तपशील व स्वरूप

  • राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2024 (National Gopal Ratna Award 2024) वर नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक श्रेणीतील ईशान्य क्षेत्र राज्यांसाठी 1 ला, 2 रा, 3 रा आणि एक विशेष पुरस्कार प्रदान करेल.
  • राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2024 मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह आणि पहिल्या दोन श्रेणींमध्ये उदा. सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट DCS/FPO/MPCs यांचा समावेश असेल.

देशी गायी/म्हशींच्या जातींचे संगोपन करणारे सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी यांच्यासाठी गायी/म्हशींच्या जाती कोणत्या असाव्यात?
गाय: डांगी, देवणी, गौळाऊ, खिलार, लाल कंधारी, कोकण कपिला, काठाणी इ.
म्हैस: मराठवाडी, नागपूरी, पंढरपूरी, पुर्नाथडी इ.

पुरस्काराची रक्कम
पहिला क्रमांक : 5,00,000/- (पाच लाख रुपये फक्त) 
दुसरा क्रमांक : 3,00,000/- (तीन लाख रुपये फक्त)
तृतीय क्रमांक : 2,00,000/- (दोन लाख रुपये फक्त)
ईशान्य क्षेत्रासाठी विशेष पुरस्कार : 2,00,000/- (दोन लाख रुपये फक्त)

सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ श्रेणीच्या बाबतीत, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2024 मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र आणि केवळ स्मृति चिन्ह असेल. कृत्रिम रेतन तंत्रज्ञ श्रेणीमध्ये कोणतेही रोख बक्षीस दिले जाणार नाही.

अर्ज कुठे कराल?

  • 2024 वर्षात राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल द्वारे ऑनलाइन https://awards.gov.in/  दाखल  केले जातील.
  • 15 जुलै 2024 पासून नामांकन सुरू होईल आणि नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 असेल.
  • पात्रता आणि ऑनलाइन अर्ज करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल अधिक तपशीलांसाठी https://awards.gov.in/ किंवा http://dahd.nic.in/hi  या संकेतस्थळाला भेट देता येईल.
  • राष्ट्रीय दूध दिनानिमित्त 26 नोव्हेंबर 2024 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.


अधिक माहितीसाठी आपल्या जवळील पशुधन विकास अधिकारी व सरकारी पशुवैद्यक दवाखान्यात संपर्क साधा.