Navinya Purna Yojana : नाविन्यपूर्ण योजनेमध्ये मोठा बदल, आता या प्राधान्यक्रमाने होणार लाभार्थी निवड; पहा शासन निर्णय

Navinya Purna Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Navinya Purna Yojana : राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करण्यात येते. या योजनेच्या लाभार्थी निवड निकषामध्ये दारिद्रय रेषेखालील लाभार्थी व अत्यल्प भूधारक शेतकरी यांचा समावेश करण्याबाबत यासंदर्भात दि. ११ सप्टेंबर २०२३ रोजी शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील प्राधान्यक्रमानुसार करण्यात येणार आहे.

१. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
२. अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
३. अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
४. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
५. महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. १ ते ४ मधील)

आवश्यक कागदपत्रे

  • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
    सातबारा (अनिवार्य)
  • ८ अ उतारा (अनिवार्य)
  • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  • आधारकार्ड (अनिवार्य )
  • ७/१२ मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  • अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  • रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  • बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अधिक माहितीसाठी जवळच्या पशुधन विकास अधिकारी किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.