मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण , प. बंगाल, ओरिसा वर घोंगावतय Yaas चक्रीवादळ

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जून महिन्यात आता मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे वातावरणात आतापासूनच बदल जाणवू लागले आहेत.  पुण्यात आज संध्याकाळच्या सुमारास हलका पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.   बुधवारपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देखील दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने पुण्यात या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवले बुधवारपासून वादळी वारे आणि शनिवारपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  पुण्यात रविवारी अनेक भागात पावसाने हजेरी लावली.  शिवाजीनगर व लोहगाव येथे अनुक्रमे 0.1 मिलिमीटर व 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.   विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोवा या चार विभागांची हवामान स्थिती प्रामुख्याने पूर्व उत्तर प्रदेश आणि कर्नाटक रेषेद्वारे द्वारे चालविली जाते.  सध्या पुणे शहरात मंगळवारपर्यंत संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी दिली आहे. पुढील आठवड्यामध्ये 27 मे ते दोन जून दरम्यान केरळमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनचा मार्ग सकारात्मक आहे.  एक जून पूर्वी त्याचे आगमन होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे यंदा वेळेवर पावसाची सुरुवात होईल असेही हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

यास चक्रीवादळाची स्थिती

नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकत आहे.  बंगालच्या उपसागरात पर्यंत दाखल झालेला मान्सूनला आणखी भाग व्यापन्यास पोषक स्थिती आहे. हा भाग संपूर्णपणे व्यापल्यानंतर मान्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे.  या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती अधिक तीव्र झाल्याने त्याचे आज दिनांक 24 रोजी सकाळी चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केले.  बंगालच्या उपसागरात गुरुवारी दिनांक 22 रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती झाली आहे. आज त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ही प्रणाली बुधवारपर्यंत म्हणजे तारीख 26 पर्यंत ओरिसा ,पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्याकडे जाण्याचे संकेत आहेत. या वादळामुळे बंगालच्या उपसागरात वाऱ्याचे प्रवाह बळकट होऊन मान्सूनचा वेगाने प्रवास सुरु होईल.

आजचे चक्रीवादळ तयार होत असताना त्याची तीव्रता तशी 55 ते 75 किलोमीटर वेगानं राहील.  सायंकाळपर्यंत त्याचा वेग 110 किलोमीटर जाईल.  उद्या म्हणजे मंगळवारी चक्रीवादळाची तीव्रता वाढून जाऊन 170 किलोमीटर पर्यंत तर बुधवारी ताशी 185 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हे कमी दाबाचे क्षेत्र अंदमान पोर्टब्लेअर पासून उत्तरेकडे ५६० किलोमीटर वर असेल. या चक्रीवादळाच्या वाढत्या तीव्रतेमुळे दोन ते तीन दिवस कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच किनारी भागातही राहू नये असा इशारा देण्यात आला आहे.