हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यामध्ये कांद्याची (Onion New Variety) मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परंतु याच कांद्याची साठवण (Onion Storage) करणे हा शेतकर्यांसमोर पडणारा नेहमीचा प्रश्न आहे. कारण खुपदा कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकर्यांना कांदा साठवून ठेवायचा असतो, परंतु काही कांद्याची विशेषता लाल कांद्याची साठवण क्षमता (Red Onion Storage Capacity) कमी असल्यामुळे शेतकर्यांना हा कांदा (Onion New Variety) कमी भावात सुद्धा विकावा लागतो.
परंतु आता याच कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी (Onion Farmers) एक आनंदाची बातमी आहे. उन्हाळी कांद्याप्रमाणेच टिकवण क्षमता असणारे लाल कांद्याचे नवीन वाण (Onion New Variety) विकसित करण्यात कृषी शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. ‘एनएचआरडीएफ-फुरसुंगी’ (NHRDF- Fursungi) असे नाव या नवीन वाणाला देण्यात आले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ ही नाशिकमध्ये (Nashik Onion Market) आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा अर्थातच कसमादे पट्टा कांदा उत्पादनासाठी विशेष ओळखला जात असून येथील बहुतांशी शेतकर्यांचे अर्थकारण कांद्यावर अवलंबून आहे. त्यामुळे लाल कांद्याचा नवीन वाण शेतकर्यांना फायदेशीर ठरणार आहे.
‘एनएचआरडीएफ’ संस्थेने विकसित केला वाण
राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान’ (NHRDF) या संस्थेने हा नवीन वाण (Onion New Variety) विकसित केलेला आहे. कांद्याचा नवीन वाण लेट खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी उपयुक्त ठरणार असून याचा शेतकर्यांना फायदा होणार आहे.
या नवीन वाणापासून (Onion New Variety) शेतकर्यांना चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळवता येणार असून हा लाल वाण अधिक टिकवण क्षमता असणारा असल्याने शेतकर्यांना याचा फायदा मिळणार आहे.
‘एनएचआरडीएफ-फुरसुंगी’ या नवीन वाणाचे वैशिष्ट्ये
- या कांद्याच्या नवीन वाणाची (Onion New Variety) लागवड केल्यानंतर अवघ्या 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होणार असा दावा संशोधकांनी केलेला आहे.
- एनएचआरडीएफ-फुरसुंगी जातीचा कांदा (Onion New Variety) आकर्षक लाल रंगाचा अन गोलाकार आहे, यामुळे याला बाजारात चांगला उठाव मिळण्याची शक्यता आहे. याला बाजारभाव देखील चांगला मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
- संशोधकांनी एनएचआरडीएफ-फुरसुंगी जातीपासून शेतकर्यांना प्रति हेक्टरी 380 ते 400 क्विंटल एवढे विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळणार असल्याचा दावा यावेळी केलेला आहे.
- या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे उन्हाळं कांद्याप्रमाणेच हा कांदा देखील काढणी पश्चात् 5 ते 6 महिने साठवून ठेवता येणार आहे.
- ही जात करपा, बुरशीजन्य रोगांना सहनशील असल्याचा दावा कृषी संशोधकांनी केलेला आहे.
निश्चितच या जातीच्या (Onion New Variety) विशेषता शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरणार्या असून या नवीन जातीमुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे.