Onion Rate Today : आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे कांदा भाव बाजार भाव बघितले असता हे भाव घसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. लाल कांद्याच्या पाठोपाठ उन्हाळी कांदा देखील कमी दरात विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज कांद्याला सर्वाधिक पंधराशे रुपयांच्या कमाल दर मिळाला आहे. हा दर कराड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज कराड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हालवा जातीच्या कांद्याचे दोनशे एक क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव चारशे, कमाल भाव पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पंधराशे रुपये का मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी असलेले 3 हजार रुपयांपर्यंतचे कांदा बाजार भाव थेट हजार रुपयांपर्यंत गडगडले आहेत. त्या खालोखाल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तेराशे रुपयांचा कमाल भाव मिळतोय. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत चौदाशे रुपयांचा कमाल भाव मिळतोय तर मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाराशे पन्नास रुपयांचा कमाल भाव कांद्याला मिळत आहे. तसेच कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चौदाशे रुपयांचा कमाल भाव कांद्याला मिळत आहे. दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांद्याची आवक झालेली पाहायला मिळत आहे. ही आवक वीस हजार 479 क्विंटल इतकी झाली आहे. तर त्याकरिता किमान भाव शंभर ते कमाल भाव तेराशे रुपयांपर्यंत तर सर्वसाधारण भाव पाचशे पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहे. कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/05/2022
कोल्हापूरक्विंटल62274001400900
औरंगाबादक्विंटल955100700400
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल126426001200950
खेड-चाकणक्विंटल25006001000800
श्रीरामपूरक्विंटल47362001100750
साताराक्विंटल23980011001000
मंगळवेढाक्विंटल1731001250800
राहताक्विंटल50222001200850
कराडहालवाक्विंटल20140015001500
अकलुजलालक्विंटल3193001400800
सोलापूरलालक्विंटल204791001300550
जळगावलालक्विंटल1441400800600
नागपूरलालक्विंटल30008001000950
इंदापूरलालक्विंटल7871501100450
भुसावळलालक्विंटल201100010001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल510200900550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल24527001200950
पुणेलोकलक्विंटल82363001100700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल417001200950
कल्याणनं. १क्विंटल3100016001300
नागपूरपांढराक्विंटल20358001000950
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल713100012001100
येवलाउन्हाळीक्विंटल150001501081750
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल7000100992700
नाशिकउन्हाळीक्विंटल34753501050700
लासलगावउन्हाळीक्विंटल118755001312850
कळवणउन्हाळीक्विंटल43002001400950
चांदवडउन्हाळीक्विंटल72005001223700
मनमाडउन्हाळीक्विंटल45002001080700
सटाणाउन्हाळीक्विंटल101401251145825
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल297513501475950
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल4389250911681
देवळाउन्हाळीक्विंटल413020014001000
उमराणेउन्हाळीक्विंटल185006501152910
नामपूरउन्हाळीक्विंटल105931001165800