हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हंगामाच्या सुरवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत तर काही ठिकाणी अद्यापही पेरण्या सुरु आहेत. अशातच बियाणे आणि खाते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका मात्र कायम आहे. म्हणूनच धोका टाळण्यासाठी सोलापुरातील एका कृषी केंद्रावरील दुकानदाराने भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. ज्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह त्यालाच खाते देण्याचा निर्णय या दुकानदाराने घेतला आहे. त्यामुळे दुकानावर होणारी गर्दी आणि कोरोनाचा धोका दोन्ही टाळल्याचे या दुकानदाराने सांगितले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापुरातील सांगोला तालुक्यातील महूद येथे मागणीपेक्षा कमी प्रमाणात युरिया खताची उपलब्धता झाली आहे. मात्र शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. युरियाचे वाटप करताना गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने येथील खत दुकानदाराने प्रत्येक खत खरेदीसाठी आलेल्या प्रत्येक शेतकर्यांनी कोरोना चाचणी करून निगेटीव्ह आलेल्या शेतकऱ्यांना खत देण्याचा निर्णय घेतला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या साहाय्याने सुमारे 200 शेतकर्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. जे शेतकर्यांची चाचणी निगेटीव्ह आली अशा शेतकर्यांना युरिया खताचे वाटप केले. येथील खत दुकानदाराने राबवलेल्या या उपक्रमाचे प्रशासनानेही कौतुक केले आहे. त्यांच्या या आडियामुळे गर्दीवर नियंत्रण राहिलेच शिवाय यूरिया खताचे वाटप ही शांतेत झाले.