महत्वाची बातमी! खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्र दिवसभर चालू ठेवण्याचे आदेश

krushi seva kendra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कृषी सेवा केंद्र सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र पूर्णवेळ सुरू ठेवण्यास अडचणी येत आहेत खरिपाचा हंगाम तोंडावर आहे त्यामुळे कृषी सेवा केंद्र उघडी राहणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर असलेली संभ्रमावस्था दूर करण्याचा प्रयत्न एका पत्रान्वये केला आहे.

कृषी खात्याने २३ एप्रिल २०२१ रोजी मंत्रालयातून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार ही दुकाने विना अडथळा चालू ठेवण्यासाठी आयुक्तांना कोणतेही निर्देश देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.आयुक्तांनी याच अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यातील कृषी सेवा केंद्रे पूर्ण दिवस चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत बोलताना कृषी आयुक्तांनी सांगितले की ,”कृषी सेवा केंद्राची सर्व कामे त्याच्याशी निगडित सर्व उत्पादने चालू ठेवण्यासाठी सकाळी सात ते संध्याकाळी सात कामे चालू राहतील. निविष्टांचे वाटप, ऑनलाईन विक्री चालू राहण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या पातळीवर आदेश द्यावेत” असे कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र कोरोनच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याबाबत देखील पात्रात नमूद केले आहे.