Panjabrao Dakh Havaman Andaj । राज्यात पाऊस कधी सुरु होणार याची सर्वजण आता आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सून ८ जून रोजी दाखल होईल असे हवामान विभागाने पूर्वी सांगितले होते. मात्र अचानक अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून १५ दिवस लांबणीवर गेला आहे. आता साधारण २५ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
पंजाबराव डख यांनी याबाबत नवीन हवामान अंदाज सांगितला आहे. मान्सून आला होता मात्र समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने आणि ते वादळ गुजरातकडे गेल्याने मान्सून लांबला असे डख यांनी म्हटले आहे. राज्यात १८ तारखेपर्यंत वारे सुरु राहील तसेच २५ जून पासून राज्यात मान्सूनची प्रगती होणार असे डख यांनी सांगितले आहे.
राज्यात पाऊस कधी सुरु होणार?
राज्यात जून महिन्याच्या चौथ्या आठवड्यात पावसाला सुरवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी १८ ते २० जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असे सांगितले आहे. तर पंजाबराव डख यांनीं २५ जून ते १५ जुलै दरम्यान राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. २५ जून ते १ जुलै यादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असे सांगण्यात आले आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj
तुमच्या गावात पाऊस होणार का ते असं करा 1 मिनिटांत चेक
शेतकरी मित्रांनो आता आपल्या गावात पाऊस कधी येणार हे समजणे शक्य झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून त्यावर प्रत्येक गावाचा अचूक हवामान अंदाज दाखवला जातो. यासोबतच जमिनीची मोजणी करणे, सरकारी योजनांना अर्ज करणे, आपला सातबारा उतारा काढणे, रोजचा बाजारभाव तपासणे आदी गोष्टी या अँपवर अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. त्यामुळेच Hello krushi हे ॲप शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहे.
दुष्काळ पडणारा नाही
अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. बिपरजोय वादळाचा पावसावर नक्कीच प्रभाव पडला आहे. मात्र चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेला आहे. यंदा पाऊस थोडा उशिरा सुरु होत असला तरी भरपूर पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. यंदा दुष्काळ पडणार नाही असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.