Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात ८ जून रोजी मान्सून दाखल होईल असे हवामान विभागाने सांगितले होते. परंतु अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून लांबला आहे. ८ जून पासून राज्यात तुरळक पावसाला सुरवात झाली आहे. आता उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी सांगितला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
केरळ मध्ये मान्सून वेळेवर दाखल झाला होता. मात्र यावेळी अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे हवामानात बदल झाला आणि वादळामुळे मान्सूनचे ढग समुद्राच्या दिशेने ओढले गेले. मागे २०१९ साली सुद्धा मान्सून केरळमध्ये आल्यानंतर अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले होते. तेव्हाही मान्सून काही दिवस लांबला होता. जेव्हा वातावरणात असा बदल होतो त्यावर्षी मोठा पाऊस होतो असा अंदाज आहे. तेव्हा यंदाही मान्सून दमदार एंट्री करेल आणि ऑकटोबर महिन्यापर्यंत पावसाळा राहील असे सांगितले आहे.
हवामान विभागाने दिला इशारा
येत्या काही दिवसांत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये मान्सूनच्या आगमनापर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे असे हवामान अभ्यासक के एस होसाळीकर यांनी सांगितले आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय गोव्याच्या सुमारे 820 किमी, मुंबईपासून 840 किमी, पोरबंदर-850 किमी व कराची-1140 किमी आहे. पुढील 48 तासांत ते आणखी तीव्र होईल. 48 तासांत जवळजवळ उत्तर-ईशान्येकडे,त्यानंतरच्या 3 दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने सरकेल असे हवामान विभागाने सांगितले आहे.
तुमच्या गावात पाऊस होणार का ते असं केले 1 मिनिटांत चेक
शेतकरी मित्रांनो वातावरणात कधी ऊन तर कधी पावसाचे पहायला मिळतो. यामुळे वातावरणात रोज बदल जाणवतो. आता आपल्याला स्वतःच्या आपल्या गावात पाऊस होणार का हे जाणून घेणं सोयीचं झालं आहे. यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi ॲपचे नाव सर्च करा आणि ॲप इंस्टॉल करा. हॅलो कृषी अँपवर तुम्हाला जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशुपालन, सरकारी योजना, शेतमाल थेट खरेदी विक्री अशा बाबीचा आता एकही रुपये खर्च न करता लाभ घेता येतो.
पूर्वेकडून पावसाला सुरवात होणार
यंदा पूर्वेकडून पावसाला सुरवात होईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनचे वारे समुद्रसपाटीपासून आरबीसमुद्रात ओढले गेले आहे. जसा जसा चक्रीवादळाचा वेग कमी होईल तसे हे मान्सूनचे ढग पूर्वेकडून भारतीय खंडात प्रवेश करतील असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. जेव्हा पाऊस पूर्वेकडून सुरु होतो तेव्हा कमी दिवसात जास्त पाऊस होतो आणि महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस होतो. तेव्हा या वर्षी चांगले पर्जन्यमान राहील असे सांगितले जात आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj
5.30am,9 जून: पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय गोव्याच्या सुमारे 820 किमी, मुंबईपासून 840 किमी, पोरबंदर-850 किमी व कराची-1140 किमी आहे.
पुढील 48 तासांत ते आणखी तीव्र होईल.48 तासांत जवळजवळ उत्तर-ईशान्येकडे,त्यानंतरच्या 3 दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने सरकेल pic.twitter.com/IIUK4zLROB— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 9, 2023
उद्यापाऊन महाराष्ट्रात पावसाला सुरवात
चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकत असून यामुळे उद्यापासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. उद्या १०, ११, १२, १३, १४ जून या कालावधीत महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात विखुरलेला पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी सांगितला आहे. यानंतर १८ ते २२ जून दरम्यान पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच नंतर थोडी उघडीप होऊन पुन्हा २६ जूननंतर पाऊस सुरु होईल असे सांगण्यात आले आहे.
पेरणी कधी करावी?
पेरणी करताना शेतामधली ओल पाहून मगच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात करावी असा सल्ला देण्यात आला आहे. २० जूनला सोयाबीन पेरणी केली तर २० ऑक्टॉबरला चार महिने पूर्ण होतायत. तेव्हा आपला सोयाबीन काढणीवेळी पावसात सापडणार नाही याचा अंदाज घेऊन सोयाबीन पेरणी करावी.