PM Kisan and NAMO Shetkari Installment : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार PM किसान व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण

PM Kisan and NAMO Shetkari Installment
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : पी.एम. किसान योजना व नमो शेतकरी योजनेच्या (PM Kisan and NAMO Shetkari Installment) राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या पी. एम. किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचे व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 5व्या हप्त्याचे एकाच दिवशी वितरण होणार आहे.

दोन्ही योजनांचे प्रत्येकी 2 हजार रुपये मिळणार (PM Kisan and NAMO Shetkari Installment)

दि. 5 ऑक्टोबर रोजी पोहरादेवी (ता. मानोर, जि. वाशिम) येथे होणाऱ्या निधी वितरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याचे व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 5व्या हप्त्याचे हस्तांतरण डीबीटी द्वारे होणार असल्याचे कृषी विभागाच्या कार्यालयाने सांगितले आहे.

पी. एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचे प्रत्येकी 2000 रुपये महाराष्ट्रातील 91.53 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.