हेलो कृषी ऑनलाईन : पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan) माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये मिळतात. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 17 हप्ते मिळाले आहेत. पीएम किसानच्या माध्यमातून दिला जाणारा 18 वा हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असताना देखील त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. परंतु 18 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) चा पुढील हप्ता मिळविण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी या 3 गोष्टी नक्कीच कराव्यात.
१) तुमच्या जमिनीची कागदपत्रे अपलोड करा.
२) सक्रिय बँक खात्याशी तुमचा आधार लिंक करा.
३) तुमचे ई-केवायसी
PM KISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC PM KISAN पोर्टलवर उपलब्ध आहे. किंवा बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधावा.