PM Kisan Samman Nidhi: लवकरच जमा होणार पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता! शेतकर्‍यांनो ‘या’ बाबींची पूर्तता केली का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न (PM Kisan Samman Nidhi) मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रू. 2,000/- प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रति वर्षी रू. 6,000/- देण्यात येते.

लागवडी लायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ekyc PM Kisan केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi) लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या (Shetkari Samman Yojana) लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील 90.20 लाख लाभार्थ्यांनी केलेली आहे.

केंद्र शासनाच्या (Central Government) निर्देशानुसार दिनांक 5 जून, 2024 ते 15 जून, 2024 या कालावधीत या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थींनी पूर्तता करण्यासाठी गाव पातळीवर विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.

या मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची स्वयं नोंदणी व e-KYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घ्यावी.

यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या (Land Seeding – No) लाभार्थींनी संबंधित तलाठी/तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे eKYC व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र (CSC) व इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या मार्फत कार्य पूर्तता करावी. 

पी.एम.किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 17 वा हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा 17 वा हप्ता वितरणा पूर्वी स्वत: करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी (Farmers) बांधवांना करण्यात येत आहे. 

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.