PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत ‘ही बातमी तुम्हाला माहित आहे का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पीएम किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) आगामी अठरावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यावर ऑक्टोबर महिन्यात जमा होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या नियमांमध्ये नुकताच एक मोठा बदल झाला असून आता पीएम किसान योजनेचे लाभार्थी (Beneficiaries of PM Kisan Yojana) पीएम किसान पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे (Mobile App) त्यांचा मोबाईल नंबर बदलू (Mobile Number Change) शकणार आहेत.

म्हणजेच जर पीएम किसानच्या (PM Kisan Samman Nidhi) लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर चेंज झाला असेल तर असे लोक पोर्टल वर जाऊन किंवा मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे त्यांचा मोबाईल नंबर चेंज करू शकतात. दरम्यान आता आपण पीएम किसानच्या पोर्टल वर जाऊन मोबाईल नंबर कसा चेंज करायचा आहे थोडक्यात समजून घेणार आहोत.

मोबाईल नंबर कसा बदलायचा? (PM Kisan Samman Nidhi)

  • यासाठी सर्वप्रथम पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर फार्मर्स कॉर्नर पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • मग तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून सर्चवर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर मग संमती पत्र स्वीकारायचे आहे.
  • यानंतर तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.
  • तुम्हाला दिलेल्या रकान्यात हा OTP टाकायचा आहे.
  • ओटीपी टाकल्यानंतर तुमची सर्व माहिती तुम्हाला स्क्रीनवर दाखवली जाणार आहे.
  • तुम्हाला खाली एक रिकामा बॉक्स दिसेल. त्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि Get OTP पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल. तो ओटीपी टाकायचा आहे.
  • यानंतर त्याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुमचा नंबर अपडेट केला जाणार आहे.
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.