हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या देशात बटाट्याचे भाव (Potato Rate Today) सुद्धा वाढत असलेले पाहायला मिळत आहे. कांदा आणि टोमॅटोच्या दरात वाढ होत असताना आता बटाटा सुद्धा महागणार त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. यामुळे केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत. दरावर (Potato Rate Today) नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार भूतानवरुन बटाट्याची आयात (Potato Import) करण्याची तयारी करत आहे.
बटाट्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विविध उपाय योजनांवर विचार करत आहे. त्यासाठी शेजारील भूतानसह इतर देशांतून लवकरच बटाट्याची आयात सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात बटाट्याचे कमी उत्पादन (Potato Production) झाल्यामुळे भाव (Potato Rate Today) चढेच राहू शकतात. कृषी मंत्रालयाच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, यावर्षी देशात बटाट्याचे उत्पादन सुमारे 58.99 दशलक्ष टन असू शकते. खराब हवामानामुळे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये बटाटा पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कांदा, टोमॅटोप्रमाणे बटाट्याचे भावही वाढू लागले आहेत. जाणून घेऊ या विविध बाजारात आजचे बटाट्याचे भाव.
विविध बाजार समितीत आजचे बटाट्याचे बाजारभाव (Potato Rate Today)
आवक (क्विंटल) कमीकमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर |
अहमदनगर 355 2000 रुपये 3200 2600 |
अकोला — 1660 2200 3000 2600 |
नाशिक — 1400 2350 3100 2650 |
जळगाव 300 2500 2800 2600 |
चंद्रपूर – गंजवड 470 3000 3500 3250 |
मुंबई 11263 2000 2800 2400 |
खेड-चाकण 1250 2000 3000 2500 |
श्रीरामपूर 120 2500 3000 2800 |
भुसावळ 52 2000 2500 2200 |
सोलापूर 456 1400 3000 1900 |
अमरावती 199 2000 2400 2200 |
पुणे 3821 2500 3000 2750 |
पुणे-मोशी 802 2300 2500 2400 |