हॅलो कृषी ऑनलाईन: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित (Protsahan Anudan For Farmers) अनुदान देण्यात येत आहे. महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजने (MJPSKY) अंतर्गत ज्या शेतकर्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांना अनुदान (Protsahan Anudan For Farmers) देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने महाविकास आघाडी सरकारचा निर्णय कायम ठेवत प्रोत्साहन पर अनुदान देण्यास सुरवात केली. या अंतर्गत 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्ष नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (Protsahan Anudan For Farmers) मिळाले आहे.
या योजनेसाठी राज्यातील विविध बँकांनी 29 लाख 2 हजार खात्यांची माहिती पोर्टलवर सबमिट केली होती. मात्र यापैकी फक्त 15 लाख 44 हजार कर्ज खाती प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरलीत. 4 लाख 90 हजार कर्जखाती आयकर दाते, पगारदार व्यक्ती आदी कारणांमुळे अपात्र ठरलीत आणि साधारणता 8 लाख 49 हजार कर्जखाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरलीत.
दरम्यान आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार विभागाने प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा (Protsahan Anudan For Farmers) लाभ मिळाला आहे याची एक सविस्तर आकडेवारी जाहीर केली आहे. सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या 15 लाख 44 हजार कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) झाले आहे.
या आधार प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी 14 लाख 40 हजार कर्जखात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी 14 लाख 38 हजार खातेदारांना 5,216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आले आहे. तसेच या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही त्यांना प्रोत्साहनपर योजनेचा (Protsahan Anudan For Farmers) लाभ मिळालेला नाही.
यामुळे सहकार विभागाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना एक मोठे आवाहन करण्यात आले आहे. अशा पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असा सल्ला देण्यात आला आहे. आपले सरकार सेवा केंद्रात (Aaple Sarkar Seva Kendra)जाऊन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करता येणार आहे.
तथापि अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून एका वर्षातच दोनदा पीक कर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळायला हवा अशी मागणी केली जात आहे. कारण अनेक शेतकरी (Farmers) बांधव खरीप आणि रब्बी हंगामासाठी दोनदा पीक कर्जाची उचल करतात आणि त्याची परतफेड देखील करत असतात. 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या काळातही अनेक शेतकऱ्यांनी एका वर्षातच दोनदा पीक कर्जाची (Crop Loan) उचल करून त्याची परतफेड केली आहे.
यामुळे हे शेतकरी पात्र असतानाही शासनाच्या एका निकषामुळे अपात्र ठरत असल्याची बाब अनेकांनी शासन दरबारी उपस्थित केली आहे. मात्र सरकारकडून या संदर्भात अजून कोणताही सकारात्मक असा निर्णय झालेला नाही. यामुळे आगामी काळात याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अशा शेतकऱ्यांना आहे.