हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुका कृषी विभागामध्ये तालुका कृषी अधिकारी व्ही .टी शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्य शुक्रवार 29 जुलै रोजी सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .पाथरी तालुका कृषी अधिकारी पदावर मागील चार वर्षापासून कर्तव्य बजावणारे ता .कृ. अधिकारी व्ही.टी .शिंदे 29 वर्षाच्या शासकीय सेवेनंतर येत्या रविवार 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत .त्यानिमित्त शुक्रवार 29 जुलै रोजी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी तालुका कृषी अधिकारी व्ही .टी . शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी शिंदे यांचा सेवागौरव करत सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील उपसंचालक बी.एस .कच्छवे ,मंडळ कृषी अधिकारी व्ही.एस नांदे , एस. बी .भिसे यांच्यासह तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी , शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक , शेतकरी गटातील सदस्य यांची उपस्थिती होती . तालुका कृषी अधिकारी पदावर असताना व्ही.टी .शिंदे यांनी उत्कृष्ठ सेवा केल्याचे निरोप सभारंभाला उपस्थित शेतकऱ्यांच्या उपस्थितीवरून दिसत असल्याचे गौरवउद्गार यावेळी उपसंचालक बी.एस . कच्छवे यांनी मनोगतामध्ये व्यक्त केले .
दरम्यान चार वर्षाच्या सेवा कारकिर्दीतील कृषी विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे शेतापर्यंत कार्यतत्पर सेवेतून दिल्याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी त्याबद्दल आपल्या मनोगतातून व्यक्त आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रभारी कृषी अधिकारी एस.एम . फुलपगार यांनी केले .कार्यक्रम यशस्वी साठी प्रकल्प आत्मा व तालुका कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .
कृषी विभागामध्ये मागील 29 वर्षापासून इमानदारीने कर्तव्य व सेवा केल्याने मला नेहमी समाधानाची शांत झोप लागते. सेवानिवृत्ती नंतरही शेतीशी जोडलेली नाळ कायम राहणार असून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत राहणार आहे . असे मत पाथरी तालुका कृषी अधिकारी व्ही . टी . शिंदे यांनी केले.