Satara News : वांग्यामुळे शेतकरी अडचणीत! 5 रुपये भाव मिळाल्याने वांगी टाकली जनावर‍ांसमोर (Video)

Satara News-
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी (Satara News) : बाजारपेठेत कांद्यानंतर आता वांग्याचे दर गडगडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. चाळीस रुपये किलो दराने असलेले वांगे आता चार रुपये किलो दराने मागितले जात असल्यामुळे शेतकरी वांगी चक्क शेतातून काढून गुरांच्या समोर टाकताना दिसून येत आहेत.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

कराड तालुक्यातील अभयचीवाडी येथील रघुनाथ येडगे या शेतकऱ्याने वांगे हे शेत पीक घेतलं होतं. मार्केटला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चाळीस रुपये किलो दराने वांग्याला दर होता. मात्र आता चार रुपये किलो दर असल्याने मार्केटला नेण्यासाठी येणारा वाहतूक खर्चही निघेना. त्यामुळे संपूर्ण शेतातील वांग्याची रोपे शेतकऱ्यांने काढून टाकली असून त्याला लागलेली भली मोठी वांगी आता गुरांना खाण्यासाठी टाकली जात आहेत.

वांगच्या भाव घसरल्याने शेतकर्‍याने वांगी टाकली जनावरांसमोर

ऊस पिक निघाल्यानंतर चार पैसे रोख मिळावेत म्हणून शेतकऱ्यांकडून उन्हाळ्यात वांगी, काकडी, कारली, टोमॅटो असे पीक घेतले जाते. शेतात सध्या पीक चांगले आले, मात्र दराने शेतकऱ्यांना मारले अशी अवस्था पाहायला मिळत आहे. (Satara News)