Seeds And Fertilizer: खरीप बियाण्यांचे 88 नमुने तपासणीत ‘पास’ तर रासायनिक खताच्या 6 नमुन्यांचा अहवाल ‘फेल’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगाम जसा जवळ आला तसे खते आणि बियाण्यांचा (Seeds And Fertilizer) खरेदीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू होते. पेरणीयोग्य पाऊस होताच शेतकरी चाड्यावर मूठ धरतात. अशावेळी शेतकर्‍यांना दर्जाहीन बियाणे आणि खतांची विक्री करून त्यांची फसवणूक होवू नये, यासाठी धाराशिव जिल्हा परिषद कृषी विभागाकडून दुकानांमध्ये जाऊन बियाणे आणि खताचे नमुने (Seeds And Fertilizer Sample) संकलित करण्यात येत आहेत.

एप्रिल व मे महिन्यात जवळपास 122 नमुने घेतले होते. ते प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असता, बियाण्यांचे (Seeds) सर्व 88 नमुने ‘पास’ झाले. मात्र, खताच्या 34 पैकी 6 नमुन्यांचा अहवाल ‘फेल’ आला आहे. आता संबंधित खत उत्पादक कंपन्यांना नोटिसा धाडण्यात येत आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या (Kharif Season) पेरणीसाठी सरासरी 77 हजार 875 मेट्रिक टन खताचा (Fertilizer) वापर करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात याचा वापर लक्षात घेऊन जिल्हा परिषद कृषी विभागाने 98 हजार 300 मेट्रिक टन खत मागणी केली होती.

मात्र, आयुक्तालयाकडून 85 हजार 800 मे. टन मागणी मंजूर करण्यात आली. बियाण्यांच्या बाबतीतही असेच काहीसे चित्र आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. कोणत्याही क्षणी पेरणीयोग्य पाऊस झाल्यास शेतकरी चाड्यावर मूठ धरतील. हीच बाब लक्षात घेऊन बियाणे, खत (Seeds And Fertilizer) उत्पादक कंपन्यांनीही पुरवठ्याची गती वाढविली आहे.

दरम्यान, कंपन्यांकडून पुरविण्यात आलेले खत आणि बियाणे (Seeds And Fertilizer Inspection) खरोखर दर्जेदार आहे का? हे पाहण्यासाठी ‘कृषी’ विभाग (Agriculture Department) पथकाकडून युद्धपातळीवर नमुने घेण्यात येत आहेत. मे आणि एप्रिल अशा दोन महिन्यांत खत आणि बियाण्यांचे (Seeds And Fertilizer) मिळून 122 नमुने घेण्यात आले. यामध्ये बियाण्यांचे 88 तर खताच्या 34 नमुन्यांचा समावेश आहे.

बियाण्यांचे नमुने परभणी तर खताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. नुकताच या नमुन्यांचा अहवाल आला आहे. तपासणीत सर्व 88 नमुने ‘पास’ झाले आहेत. मात्र, खताच्या 34 पैकी 6 नमुन्यांचा अहवाल ‘फेल’ आला आहे. आता संबंधित खत उत्पादक कंपन्यांना आता ‘कृषी’कडून (Agriculture sector) नोटिसा बजावण्यात येत आहेत. खुलासा असामाधानकारक आढळून आल्यास त्यांच्याविरूद्ध पोलीस कारवाई करण्यात येणार आहे (Seeds And Fertilizer) .

‘त्या’चा एकही नमुना नाही

पेरणी होते ना होते तोच कोवळ्या पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव सुरू होतो. कीटरोड आटोक्यात आणण्यासाठी कीटकनाशकांची (Pesticides Spraying) फवारणी केली जाते. दर्जाहीन कीटकनाशके पुरवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी कीटकनाशकांचेही नमुने घेतले जातात. हे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासले जातात. मात्र, मागील दोन महिन्यात ‘कृषी’च्या पथकाकडून एकही नमुना घेण्यात आलेला नाही, हे विशेष.