यशोगाथा : शेळीपालनाने बदलले कृषी पदवीधराचे नशीब, महिन्याला होतेय लाखोंची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : शेळीपालन हा असा व्यवसाय आहे, जो अगदी कमी खर्चात आणि कमी जागेतही सहज करता येतो. दूध आणि मांसासाठी त्याचे पालन केले जाते. शेळीपालनाचे हे फायदे पाहून महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा गावातील शांतीपाल आनंद सोनुने हा युवक शेळीपालन या व्यवसायात उतरला आहे. आज ते यातून दरमहा लाखोंची कमाई करत आहेत.

शांतीपाल सोनुने हे कृषी विषयात पदवीधर आहेत. ते दीडशेहून अधिक शेळ्यांचे पालनपोषण करून दररोज नफा कमावतात. शांतीपाल यांच्या मते, भारतात शेळीपालन हा व्यवसाय पूर्ण नियोजन करून व्यवसाय केला तर हा उत्तम पर्याय ठरेल. परंतु ज्ञान, अनुभव आणि फायदेशीर शेळीपालन व्यवसाय नियोजनाच्या अभावामुळे अनेक शेळीपालन करणारे या व्यवसायात अधिक चांगला लाभ घेऊ शकत नाहीत.

शांतीपाल हे ॲग्री-क्लिनिक अँड ॲग्री-बिझनेस सेंटर (AC&ABC) योजनेअंतर्गत प्रशिक्षित कृषी-उद्योजक आहेत. कृष्णा व्हॅली प्रगत कृषी प्रतिष्ठान, नागपूर येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांनी शेळीपालन युनिटला भेट दिली. त्यांनी तांत्रिक व विपणन कौशल्याची मदत घेतली व वयोमानानुसार फरक ठेवून शेळ्या पाळल्या तर रोज पैसे कमावता येतात, असे शांतीलाल सोनुने यांनी सांगितले.

शांतीपाल यांचे अर्धा एकर जमिनीवर १५० शेळ्यांचे फार्म आहे. १५० शेळ्यांसाठी जमीन निवडताना कोणतेही कठोर नियम नाहीत. तुमच्याकडे जी काही जमीन आहे ती वापरणे चांगले. जर तुमच्याकडे हिरवळ आणि कुरण असलेली अतिरिक्त जमीन असेल तर शेळ्यांना चरण्यासाठी फायदेशीर ठरते.

शांतीपाल हे शेळीपालन आणि प्रशिक्षण यातून चांगली कमाई करत आहेत. त्यातून त्यांची वार्षिक उलाढाल ८ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. शांतीपाल सोनुने हे जवळच्या ८ गावातील १०० हून अधिक शेतकऱ्यांना सल्ला व सेवा देतात. त्यांनी त्यांच्या शेळीपालनात व्यवसायात ३ जणांना रोजगारही दिला आहे.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.