Government Scheme : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम नवनवीन योजना राबवत असते. याचा अनेक शेतकरी देखील लाभ घेत असतात मात्र काही योजना अशा असतात ज्यापासून शेतकरी वंचित राहतात किंवा फक्त बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ मिळत असतो. दरम्यान बळीराजासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकऱ्यांचा लाभ दिला जातो. आता या योजनेतील लॉटरी पद्धत आता बंद करून सर्वच अर्जदारांना शेततळे देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता यासाठी शेतकरी घर बसल्या आपल्या मोबाईलवरून Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
कोरोना काळामध्ये दोन वर्षे वैयक्तिक शेततळे योजना बंद होती मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही आमदारांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे जर शेततळे पूर्ण झाले तर संबंधित शेतकऱ्याला प्लास्टिक अस्थिकरणासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार असून त्यासाठी देखील 75 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठी अट
सरकारच्या कोणत्याही योजना असल्या तरी त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अटी शर्ती असतातच. या अटींचे पालन केल्यास शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळतोच. दरम्यान शेतकऱ्यांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. यासाठी लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याने बँक खात्याशी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर शेततळे मंजूर झाल्यानंतर त्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करावी अशी अट आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 261 जणांना मिळाले अनुदान
वैयक्तिक शेततळ्याचे आठ प्रकार आहेत त्यासाठी जवळपास सरकार 20 ते 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ६९० शेतकऱ्यांचे अर्ज या योजनेसाठी प्राप्त झाले असून त्यामधील जवळपास 261 जणांना हे अनुदान मिळाले आहे त्याचबरोबर आता जे शेतकरी उरले आहेत त्यांना देखील लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे
वैयक्तिक शेततळ्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभधारक शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे बंधनकारक
- बँक पासबुक
- मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला
- जमिनीचा सातबारा उतारा (शेतकऱ्यांच्या नावे किमान 60 गुंठे जमीन असणे आवश्यक)
या ठिकाणाहून करू शकता अर्ज
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेततळ्याचा लाभ घ्यायचा असेल आणि ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर या ॲपच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर अन्य सरकारी योजनांची देखील तुम्हाला यामध्ये माहिती मिळू शकते त्यामुळे तुम्ही जर कोणत्या योजनेपासून वंचित राहत असाल तर या ॲपमध्ये तुम्हाला त्याबाबत सर्व माहिती मिळेल त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले हॅलो कृषी हे ॲप इन्स्टॉल करा.