हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्हाला सांगीतले की माती हवेतून पाणी शोषून (Soil Absorbs Water From Air) घेते तर कदाचित तुम्हाला खरे वाटणार नाही. परंतु ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास (The University of Texas at Austin) येथील संशोधकांनी हायड्रोजेल-इन्फ्युज्ड माती (Hydrogel-Infused Soil) विकसित केली आहे जी हवेतून पाणी शोषून घेते (Soil Absorbs Water From Air). या शोषलेल्या पाण्यातून ही माती त्यावर वाढणाऱ्या वनस्पतीचे पोषण करते. यामुळे पिकाच्या देठाची लांबी 138 टक्के पर्यंत तर वाढतेच शिवाय पाण्याचा 40 टक्केपर्यंत कमी वापर होते. या स्मार्ट मातीमुळे (Smart Soil) शाश्वत शेतीसाठी (Sustainable Farming) मदत होते.
ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी एक नाविन्यपूर्ण माती विकसित केली आहे जी शाश्वत शेतीसाठी क्रांती घडवून आणू शकते. हायड्रोजेलयुक्त या नवीन अभियांत्रिकी मातीत, हवेतून पाणी शोषणाची (Soil Absorbs Water From Air) अद्वितीय क्षमता आहे, ज्यामुळे झाडे पाण्याची कमतरता, दुष्काळ यासारख्या आव्हानात्मक परिस्थितीतही पिके किंवा झाडे जलयुक्त राहतील. याव्यतिरिक्त, खतांच्या नियंत्रित वापरामुळे, पिकाला एक सातत्यपूर्ण पोषक पुरवठा करता येतो. नियमित मातीत वाढलेल्या वनस्पतींच्या तुलनेत या स्मार्ट मातीत वाढलेल्या वनस्पती आकाराने मोठ्या आणि निरोगी वाढतात.
प्रायोगिक चाचण्यांमध्ये, या हायड्रोजेल-इन्फ्युज्ड मातीने उल्लेखनीय परिणाम दाखवले आहे. या स्मार्ट मातीत (Soil Absorbs Water From Air) उगवलेल्या वनस्पतींच्या देठाची लांबी सामान्य मातीच्या तुलनेत 138 टक्के जास्त वाढ झालेली आढळून आलेली आहे. शिवाय, सुधारित माती अंदाजे 40 टक्के पाण्याची बचत सुद्धा करते, ज्यामुळे पिकाला वारंवार सिंचित करण्याची गरज नसते, मजबूत व चांगले पीक विकसित होते.
सध्याच्या काळात या स्मार्ट मातीचा विकास महत्त्वाचा आहे कारण कृषीक्षेत्रात सध्या जागतिक गोड्या पाण्यापैकी 70% वापरले जाते. काही विकसनशील राष्ट्रांमध्ये ही आकडेवारी 95% पर्यंत पोहोचते. वाढती जागतिक लोकसंख्या, हवामान बदलाच्या (Climate Change) परिणामांसह, अधिक कार्यक्षम आणि शाश्वत कृषी पद्धतींची मागणी तीव्र झाली आहे. पारंपारिक शेती पद्धती, विशेषत: सिंचन आणि खते, पाणीटंचाई आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे कमी व्यवहार्य होत आहेत. त्यामुळे या नवीन स्मार्ट मातीचा शोध कृषी क्षेत्रात चांगले परिवर्तन घडवून आणू शकतात. हे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी एक गेम चेंजर म्हणून ठरू शकते.
हायड्रोजेल असलेली माती केवळ (Soil Absorbs Water From Air) वारंवार सिंचनाची (Frequent Irrigation) गरजच कमी करत नाही तर रासायनिक खतांच्या अति वापरामुळे पर्यावरणीय प्रभाव देखील कमी करण्यास मदत करू शकते. पोषक तत्वे वाहून जाणे आणि मातीचा ऱ्हास (Soil Degradation) यासारख्या समस्यांना आळा बसू शकतो.
हायड्रोजेलयुक्त माती शुष्क प्रदेशांपासून ते अधिक समशीतोष्ण विस्तृत हवामानासाठी योग्य पर्याय ठरू शकते.