हॅलो कृषी ऑनलाईन: सोयाबीनचे दोन नवीन वाण (Soybean New Variety) आता महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी विकसित करण्यात आलेले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Dr. PDKV Akola) अंतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र (Regional Research Centre) अमरावती (Amravati) यांनी दोन नवीन सोयाबीन वाण विकसित केले आहेत. हे वाण कमी कालावधीत उच्च उत्पादन (High Yielding Soybean Variety) देतात आणि विविध रोग आणि किडींना प्रतिरोधक (Pest Disease Resistant Variety) आहेत. जाणून घेऊ या नवीन वाणाचे (Soybean New Variety) वैशिष्ट्ये.
सोयाबीनचे नवीन विकसित वाण (Soybean New Variety)
पीडीकेव्ही अंबा (PDKV Amba)
- लवकर काढणीस येणारे (94 ते 96 दिवसात)
- जास्त उत्पादन क्षमता (हेक्टरी 28 ते 30 क्विंटल)
- तीन दाण्यांच्या शेंगांचे प्रमाण व दाण्याचे वजन जास्त
- तेल आणि प्रथिनाचे प्रमाण जास्त
- हवामान बदलाचा फारसा परिणाम होत नाही
- मुळकुज/खोडकुज, चक्रभुंगा आणि खोडमाशी यांना मध्यम प्रतिकारक
- परिपक्व झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांपर्यंत शेंगा फुटत नाहीत
सुवर्ण सोया (Suvarn Soya)
- बुरशीजन्य रोगांना प्रतिरोधक
- शेंगांवर आणि झाडांवर लव असल्यामुळे किडींना प्रतिरोधक
- संपूर्ण भारतात मुळकुज/खोडकुज या रोगास प्रतिकारक्षम
- इतर वाणांपेक्षा 22 टक्के जास्त उत्पादकता
- शेंगांची संख्या जास्त
- परिपक्वतेचा कालावधी 98 ते 102 दिवस
- सरासरी उत्पादकता हेक्टरी 24 ते 28 क्विंटल
- मुळकुज/खोडकुज, पानांवरील बुरशीजन्य ठिपके यांना प्रतिकारक
- चक्रभुंगा आणि खोडमाशीला मध्यम प्रतिकारक
- परिपक्व झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांपर्यंत शेंगा फुटत नाहीत
काय आहेत या नवीन वाणांचे फायदे (Soybean New Variety)
कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या या वाणात (Soybean New Variety) चांगल्या दर्जाचे तेल आणि प्रथिने देण्याची क्षमता आहे. विविध रोग आणि किडींना प्रतिरोधक असून हवामान बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता आहे.
कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना या नवीन सोयाबीन वाणांचा (Soybean New Variety) वापर करण्याचे आवाहन केले आहे. या वाणांमुळे (Soybean New Variety) शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि चांगले उत्पन्न मिळू शकेल.
खरेदीसाठी येथे संपर्क करा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती
फोन क्रमांक: 07251-254123