Soyabean Rate Today :सोयाबीनचे भाव पुन्हा वाढले, आज मिळाला कमाल 8355 रुपयांचा भाव…

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यामध्ये सोयाबीनला (Soyabean Rate Today) चांगला भाव मिळाला होता. हा भाव 7500 रुपये कमाल इतका होता. सोयाबीनच्या दरात या आठवड्याच्या सुरुवातीला घट नोंदवण्यात आली आहे. मात्र सोयाबीनचे आजचे बाजार भाव पाहता बाजार भाव सुधारल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे आज दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल आठ हजार 355 रुपयांचा भाव मिळाला आहे.

आज दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 300 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान 3875, कमाल आठ हजार 355 आणि सर्वसाधारण सात हजार 350 रुपये इतका भाव मिळाला आहे. त्याखालोखाल लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल सात हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला. उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7150 रुपयांचा कमाल भाव मिळाला. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील सोयाबीनच्या(Soyabean Rate Today) दरात वाढ झालेली दिसून येते आहे.

आवक मंदावली

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ला कमाल 7360 रुपयांचा भाव मिळाला मात्र आवक कमी झाल्याचे दिसून येते आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6029 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनच्या पुन्हा वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र एकूणच सोयाबीनचे सर्वसाधारण भाव बघता हे जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयांपर्यंत आहेत. आगामी खरीप हंगामामध्ये सोयाबीनची(Soyabean Rate Today) लागवड मोठ्या प्रमाणात केली जाण्याची शक्यता आहे. कारण सोयाबीनला मिळणारा चांगला भाव हे त्यामागचं कारण आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 6-5-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/05/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल145300072007051
औरंगाबादक्विंटल28580066006200
राहूरी -वांबोरीक्विंटल2500050005000
उदगीरक्विंटल1981710071507125
तुळजापूरक्विंटल185670069006800
राहताक्विंटल14679569006850
सोलापूरलोकलक्विंटल3677567756775
नागपूरलोकलक्विंटल261600069076880
हिंगोलीलोकलक्विंटल190660069886794
कोपरगावलोकलक्विंटल180400069216760
मेहकरलोकलक्विंटल720650070006700
लातूरपिवळाक्विंटल6029630073607250
जालनापिवळाक्विंटल726550072256850
अकोलापिवळाक्विंटल520620068956600
यवतमाळपिवळाक्विंटल383650069456722
चिखलीपिवळाक्विंटल589640071286764
बीडपिवळाक्विंटल48650069006650
वाशीमपिवळाक्विंटल1300645070506850
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल700640068006600
पैठणपिवळाक्विंटल10527652765276
वर्धापिवळाक्विंटल54587568756500
भोकरपिवळाक्विंटल30600068036401
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल177650067006600
जिंतूरपिवळाक्विंटल8672067206720
मलकापूरपिवळाक्विंटल275556067256535
गंगाखेडपिवळाक्विंटल18670070006800
दर्यापूरपिवळाक्विंटल300387583557355
गंगापूरपिवळाक्विंटल9512564356420
मंठापिवळाक्विंटल27600067016650
मुरुमपिवळाक्विंटल44650169706736
उमरगापिवळाक्विंटल44600169006500
सेनगावपिवळाक्विंटल110620068006500
काटोलपिवळाक्विंटल60540066515850
सोनपेठपिवळाक्विंटल61600069006800
देवणीपिवळाक्विंटल23690071917045