हॅलो कृषी ऑनलाईन: यावर्षी सोयाबीन बियाण्यांच्या (Soybean Seed) किमतीत वाढ झालेली आहे.सध्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) बियाणे खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि याबरोबरच सोयाबीन बियाण्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. काही खासगी बियाणे कंपन्यांनी मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांचे (Soybean Seed) दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत. यामुळे शेतकर्यांवर (Farmers) आर्थिक बोझा वाढण्याची शक्यता आहे.
सोयाबीन बियाणे (Soybean Seed) दरातील वाढ
प्राप्त माहितीनुसार एका कंपनीने 23 किलो वजनाच्या बॅगची किंमत तब्बल 4150 रुपये इतकी निश्चित केली आहे. तर दुसर्या कंपनीचे 25 किलो बॅग 3450 रूपयांना विकली जात आहे.
गेल्या हंगामात प्रचंड मागणी असलेल्या सोयाबीन उत्पादक एका कंपनीच्या वाणाची (Soybean Variety) किंमत यंदा किलोला 200 रुपये इतकी आहे.
पारंपरिक वाणांवर परिणाम
पारंपरिक 335 आणि 9305 या वाणांना (Desi Varieties) मागणी कमी असल्याने त्यांच्या दरात वाढ झाली नाही.
मात्र इतर बियाण्यांच्या दरात 300 ते 600 रूपयांपर्यंत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
बियाणे कंपन्यांची मार्केटिंग (Seed Company Marketing)
काही बियाणे कंपन्या गावोगावी थेट प्रतिनिधी पाठवून बुकिंग आणि पुरवठा करत आहेत.
या व्यवहारात शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नाही. राउंडअप बीटी नावाच्या तणनाशकाला प्रतिरोधक असलेल्या सोयाबीन बियाण्यांचा जातीचा मोठा गोरखधंदा सुरू आहे. विशेष म्हणजे या मार्केटिंगवर गुणवत्ता नियंत्रण विभागाचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकर्यांची बियाणे खरेदीत फसवणूक होऊ शकते.
शेतकर्यांनी घ्यायची काळजी
- शेतकर्यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. व बिलाची आणि पावतीची मागणी करावी.
- सरकारी बियाणे संस्थांकडून उपलब्ध असलेल्या बियाण्यांचा विचार करावा.
- कृषी विभागाकडून (Agriculture Department) बियाण्यांच्या दराबाबत माहिती घ्यावी.
- या वाढत्या दरांमुळे शेतकर्यांवर आर्थिक बोझा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी सोयाबीन बियाणे (Soybean Seed) खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.