हॅलो कृषी ऑनलाईन: आजच्या तरुण तरूणींचीशिक्षण घेऊन (Success Story) लवकरात लवकर चांगला जॉब किंवाव्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची धडपड सुरू असते. यासाठी ते नवनवीन प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान शिकतात. यातूनच व्यवसायाच्या नवीन संधी त्यांच्या समोर निर्माण होतात (Success Story).
अहिल्या नगर (Ahilyanagar) जिल्ह्यातल्या मालदाड गावात राहणारी सुप्रिया नवले (Supriya Navale) यापैकीच एक तरुणी. बीएस्सी अॅग्रीपर्यंतचं (Agricos) शिक्षण झाल्यानंतर तिने पुण्यात ड्रोन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेतलं. आणि सध्या ती ड्रोन पायलट (Drone Pilot) म्हणून काम करत आहेत (Success Story).
नोव्हेंबर महिन्यात ड्रोन पायलटचे प्रशिक्षण (Drone Pilot Training) पूर्ण झाल्यानंतर सुप्रिया यांना फेब्रुवारीमध्ये एका कंपनीकडून ड्रोन देण्यात आले. त्यासोबत एक इलेक्ट्रिक व्हेईकल, जनरेटर, बॅटरी या वस्तू देण्यात आल्या.
सुप्रिया यांच्याकडील ड्रोन पिकांवर कीटनाशक, बुरशीनाशक आणि खतांच्या फवारणीसाठी वापरले जाते.
शेतकरी ड्रोनद्वारे फवारणीसाठी (Drone Spraying) विचारणा करण्यासाठी सुप्रिया यांच्याकडे येतात. त्यानंतर मग ड्रोन, बॅटरीज आणि जनरेटर हे साहित्य इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये ठेवून सुप्रिया शेतकऱ्याच्या शेताकडे निघते (Success Story).
सुप्रिया सांगते की शेतकऱ्याच्या शेतावर गेल्यावर पहिल्यांदा इन्स्ट्रूमेंट सेट-अप करते. त्यानंतर शेतकऱ्याच्या शेताची पाहणी करून तिथे काही अडथळा (Farm Obstacle) आहे का, बांधावर किंवा बांधाच्या बाजूला काही आहे का, हे सगळ ती पाहते. हे सगळ तिला रिमोट कंट्रोलद्वारे दिसते.
यानंतर ज्या क्षेत्रावर फवारणी करायची आहे, ते क्षेत्र बघून मॅपिंग करुन कॉर्नर पॉईंट सिलेक्ट करते. मधे स्पेसिंग, डिस्टन्स, अल्टिट्यूड मेटेंन करुन घेते आणि मग ऑटो मोडमध्ये 7 मिनिटात 1 एकर क्षेत्रावर फवारणी पूर्ण होते (Success Story).
ड्रोनद्वारे कीटनाशकांची किंवा खतांची फवारणी, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी सध्या तरी कुतूहलाचा विषय आहे. ज्यावेळेस सुप्रिया एका शेतात फवारणी करण्यासाठी ड्रोन घेऊन जाते, त्यावेळेस आजूबाजूचे शेतकरी हे सगळ बघण्यासाठी एकत्र जमतात.
शेतकऱ्यांना हे ड्रोन तंत्रज्ञान नेमके कसे कार्य करते हे समजून घेण्याचे कुतूहल असते.
ड्रोन फवारणीतून रोजगार
शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ड्रोनद्वारे फवारणी करून देत असल्यामुळे सुप्रिया यांना एक प्रकारचा रोजगार मिळाला आहे.
सुप्रिया सांगतात, की एक एकर क्षेत्र फवारणीसाठी ती 300 रुपये घेते. अजून तरी तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीनच आहे. व्यवसाय सुरु करून जेमतेम एक-दीड महिनाच झालाय. तरी ती दिवसाला 4 ते 5 हजार रुपये घरी घेऊन येते (Success Story).
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सुप्रिया सांगते की तिनेशेतकरी भीमराज नवले यांच्या डांगर पिकावर ड्रोनद्वारे फवारणी केली. ड्रोनद्वारे केलेली फवारणी शेतकऱ्याला आश्वासक वाटली.
भीमराव सांगतात, “पहिले बॅटरी पंपानं फवारणी देत होतो. एक पंप मारायला साधारण 10 ते 15 मिनिटे लागायचे. 10 पंप मारायला साधारण 2 तास जायचे. आता 10 मिनिटामध्ये एक एकर क्षेत्रावर फवारणी होऊन जाते. पावसाचं वातावरण असलं तरी 10 मिनिटात पूर्ण फवारा होऊन जातो आणि आपलं औषध पण सेव्ह होतं आणि मॅनपॉवरचा इश्यू याच्यातून सॉल्व्ह होतो.”
काही पिके जसे की ऊस, मका या पिकांची उंची जास्त असते. ही पिके कमरेच्या वरती गेल्यावर त्यावर फवारणी करता येत नाही. याशिवाय साप, बिबट्या अशा प्राण्यांचाही धोका असतो. अशा स्थितीत ड्रोनने फवारणी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांकडे असू शकतो.
आजच्या धावत्या जगात आणि सगळीकडे जॉबसाठी प्रचंड स्पर्धा असताना सुप्रियाने स्वतःसाठी निर्माण केलेला रोजगार (Success Story) कौतुकास्पद आहे.