Success Story: शेतकर्‍याने सुरू केला अगदी कमी किमतीत कोळपे विक्रीचा व्यवसाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामातील पिके (Success Story) सध्या कोळपणीच्या (Kolpe Yantra) अवस्थेत आहेत. यंदा चांगला पाऊस पडल्याने पिके सुद्धा जोमात आहेत मात्र काही शेतकर्‍यांकडे कोळपणीसाठी बैल (Bull Hoe) नाहीत. यावर उपाय म्हणून अनेक शेतकरी सायकलच्या कोळप्याने कोळपणी करत असल्याचे पाहायला मिळते. एका शेतकर्‍याने तर स्वत:कडे बैल नव्हते म्हणून कोळपे विक्रीचा व्यवसायच सुरू केला (Kolpe Yantra Business).

धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील नळी वडगाव फाटा इथल्या श्रीकांत शिकतोड यांचा हॉर्डवेअर आणि टायर विक्रीचा व्यवसाय आहे. अनेक वर्षांपासून ते हा व्यवसाय आणि सोबत शेतीसुद्धा करतात. परंतु शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे बैल नसल्याने त्यांनी 2 वर्षांपूर्वी सोयाबीन कोळपणीसाठी सायकलचे कोळपे खरेदी करायचे ठरवलं. मग एका कोळप्याची किंमत पंधराशे रुपये असल्याचे लक्षात येताच त्यांनी कोळप्याची बारकाईने पाहणी केली आणि स्वत:च हे कोळपे तयार करून शेतकर्‍यांना स्वस्तात विकायचे ठरविले (Success Story).

यासाठी त्यांनी मग त्यांनी कोळपे बनवायला सुरुवात केली (Success Story). ‘आकाश इंजिनिअरिंग वर्क्स’ (Akash Engineering Works) या नावाने कोळपे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आता ते दिवसाकाठी तब्बल 100 ते 150 कोळपे बनवून विकतात. त्यातून त्यांना मजुरी आणि इतर खर्च वगळून 1 हजार रुपये मिळतात (Success Story).

त्यांच्या या उदात्त हेतूमुळे आता शेतकर्‍यांना चांगल्या दर्जाचे आणि स्वस्तात कोळपे मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे अनेक शेतकरी त्यांच्याकडे कोळप्यांसाठी आधीच बुकिंग करतात. महत्त्वाचे म्हणजे 2 भावांनी शेतकर्‍यांना स्वस्तात कोळपे मिळावे या उद्देशानी स्वतःसाठीही कमी का होईना पण रोजगार निर्माण केलाय हे कौतुकास्पद आहे (Success Story).

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.