महाराष्ट्रात पुढील दोन दिवस थंडीचे प्रमाण कमी राहणार; पाकिस्तान कडूनही येणारे थंड वारे झाले कमी

Weather Report
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन | अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टी, गुजरात ते राजस्थानच्या नैऋत्य भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून साधारण ९०० मीटर उंचीवर आहे. राजस्थानमधील नैऋत्य भागात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून १.५ ते २.१ किलोमीटर उंचीवर आहे. याबरोबरच काश्मीर आणि उत्तर पाकिस्तान कडूनही थंड वाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचं बरोबर उत्तरेकडच्या काही राज्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी होईल असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान हरियानातील हिस्सार येथे उणे १.२ अंश सेल्सियसचे सर्वात कमी तापमान नोंदविले गेले आहे. तसेच सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये थंडी कमी झाली आहे. परिणामी किमान तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किंचित थंडी आहे. नगर, नाशिक जळगाव या भागात बऱ्यापैकी थंडी आहे. येथील किमान तापमान १३ ते २० अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविले गेले आहे.

कोकणात थंडीचे प्रमाण काहीशा प्रमाणात कमी झाले आहे. कोकणात १८ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदविण्यात आले आहे. मराठवाड्यात थंडीचे प्रमाण बरेच कमी झाले आणि तापमानात वाढ झाली आहे. तर विदर्भात अनेक भागात थंडी कमी जास्त होते आहे. येथील तापमान किमान १२ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. गेले काही दिवस थंडीने कुडकुडणाऱ्या नागरिकांना थंडीपासून थोडी सुटका मिळणार आहे.