Termeric Price : हळदीचे भाव खरोखरच 35 हजारांवर पोहोचले का? जाणून घ्या बाजारातील परिस्थिती

Turmeric Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Termeric Price : मागच्या काही दिवसापासून टोमॅटोच्या भावाची सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे टोमॅटो. नंतर आता सध्या हळदीच्या भावाची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. हळदीच्या भावाने 35 हजारांचा टप्पा गाठल्याच्या बातम्या आता आपल्याला ऐकायला मिळत आहे. त्याचबरोबर हळद उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो ते करोडो रुपये कमवले असल्याच्या देखील चर्चा आता चांगल्याच रंगल्या आहेत. मात्र अशा बातम्या आपण ऐकल्या असल्या तरी शेतकऱ्यांना विचारलं तर हे चित्र काही वेगळेच दिसते. बाजारातील केवळ कमाल भावाची चर्चा होते पण कमाल भाव कमी मालाला मिळतो तर सरासरी भाव जास्त मलाला मिळतो त्यामुळे सरासरी दरावरच बाजाराचा विचार व्हावा असे जाणकारांनी म्हंटले आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

मागच्या दहा दिवसापासून हळदीच्या भावाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यामधील मार्केटमध्ये हळदीला प्रतिक्विंटल तीस हजार रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर हा विक्रम पाचच दिवसात मोडीत निघाला असून हळदीचे भाव 35 हजार रुपयांवर पोहोचले. सेलम वाणाच्या हळदीला हा विक्रमी भाव मिळाला होता. यानंतर सगळीकडे हळदीच्या भावाच्या चर्चा सुरू झाल्या.

“…तरच बाजारातील खरी स्थिती कळते”

हिंगोली जिल्ह्यातील वसमत बाजारात मिळालेल्या 35 हजारांचा भाव केवळ दहा क्विंटलच्या एका लॉटला मिळाल्याची माहिती समोर आली आह. याच बाजारांमधील सरासरी हळदीचा भाव 15 ते 17 हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. त्यामुळे हे भाव कमाल भावापेक्षा सरासरी भावपेक्षा कमीच आहेत त्यामुळे मालाच्या सरासरी भावावर चर्चा केल्यावर बाजारातील खरी स्थिती कळण्यास मदत होते.

लागवडी योग्य पाऊस न झाल्याने यंदा हळदीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. उशिरा लागवडी सुरू झाल्यामुळे देशातील हळद लागवड यावर्षी 15 ते 20 टक्क्यांनी कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. निर्यात देखील यंदा जवळपास 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे हळदीच्या दराला आधार मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

इथे पाहू शकता हळदीचा मोफत बाजार भाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद किंवा इतर पिकाचा बाजार भाव रोजच्या रोज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर त्या ॲपमध्ये बाजारभाव ह्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमच्या पिकाचा रोजचा बाजार भाव पाहू शकता तेही अगदी मोफत. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.

शेतमाल : हळद/ हळकुंड (Termeric Price)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/08/2023
भोकरक्विंटल2880090008900
11/08/2023
नांदेडक्विंटल145680001900014495
हिंगोलीक्विंटल1250138001550014650
मुंबईलोकलक्विंटल87140001600015000
सेनगावलोकलक्विंटल125100001410012000
सांगलीराजापुरीक्विंटल124675001800012750
लोहाराजापुरीक्विंटल955001300011100
आखाडाबाळापूरराजापुरीक्विंटल13190002000019500