घराच्या छतावर शेती करून 20,000 प्रति महिना कमावते ही 12वी पास महिला; मिळाले आहेत 42 सन्मान

terrace-farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । आपल्या घराच्या गरजांसाठी गच्चीवर भाजीपाला पिकवणे सामान्य आहे. आजकाल बरेच लोक टेरेस बागकामात रस घेत आहेत. छोट्या-छोट्या किंवा मोठी झाडे उगवण्यासाठी लोक आपल्या घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये उपलब्ध असलेली काही जागा वापरत आहेत. शुद्ध व निरोगी खाण्याकडे वाढती जागरूकता हे त्याचे मुख्य कारण आहे. परंतु, आज आम्ही तुम्हाला एका अशा बाईची ओळख करून देत आहोत, जी गेली 24 वर्षे आपल्या घराच्या छतावर फक्त बागकाम करीत नसून अख्खी शेंद्रीय शेती करीत आहे आणि त्यातूनही पैसे कमवत आहे.

केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एदवानाक्कड गावची रहिवासी सुलाफत मोईदीन (वय 46) छताच्या शेतीसाठी ओळखल्या जातात. त्यांच्याकडून प्रेरणा घेतल्यानंतर बर्‍याच लोकांनी त्यांच्या घराच्या छतावर हिरव्या भाज्या आणि भाजीपाला पिकविण्यास सुरुवात केली आहे. सामान्य नागरिकांव्यतिरिक्त त्यांना केरळच्या कृषी विभागाकडूनही खूप प्रशंसा मिळाली आहे. सन 2020 मध्ये त्यांना केरळच्या ‘बेस्ट टेरेस फार्मर्स’ प्रकारातही पुरस्कार मिळाला आहे.

त्या म्हणतात की, “स्थानिक दुकानांत व कृषी भवनात स्टॉल्स लावून छतावरील सर्व वस्तूंची विक्री केली जाते. त्यांच्या शेजारी राहणारे लोकही त्यांच्या घरी येतात आणि फळे आणि भाज्या खरेदी करतात.” दर महिन्याला त्या फक्त त्यांच्या छतावरून 20 हजार रुपये मिळवतात. कधीकधी त्यांची कमाई यापेक्षा जास्त असते. सुलफत म्हणतात, “छतावर शेतीतून पैसे मिळवण्याबरोबरच मी केवळ माझ्या कुटुंबासाठीच नाही तर इतर लोकांना देखील सेंद्रिय आणि शुद्ध भोजन देण्यास सक्षम आहे. म्हणूनच मी नेहमीच लोकांना छताचा योग्य वापर करण्याचा सल्ला देते’.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/KzJiHgVregE3FOlwpDTyW6