हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला

Onion Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील केतूर येथे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस तसेच पहाटे पडणारे धुके यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस पडतो आहे. सोलापूर जिल्ह्यातही हीच परिस्थिती दिसून येते आहे. सध्या येथे नवीन कांदा लागवडी सध्या सुरू आहेत. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात उजनीला लाभक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान व अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे.

या बदललेल्या हवामानाचा सर्वांधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. कांदा पिकावर करपा, आकडी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कांदा उत्पादक महागड्या औषधांची फवारणी करून कांदा पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र असेच वातावरण राहिले तर शेतकऱ्याला पुन्हा पीक गमवावे लागेल अशी भीती वाटते आहे.

राज्यात मागील काही दिवसापासून हवामान बदलले आहे. कधी पाऊस तर कधी थंडी, मध्येच ढगाळ वातावरण यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. तूर, हरभरा या पुकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. तर कांद्यासारखी इतर पिके मात्र कोमेजून गेली आहेत. दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.