‘राफेल’ नाम ही काफी है…! बैलाला मिळाली SUV कारपेक्षा जास्त किंमत!

Bull Raphael
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो ‘राफेल’ असं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला साहजिकच राफेल लढाऊ विमाने आठवतील. पण शेतकरी मित्रांनो आपण आज ज्या ‘राफेल’ बद्दल जाणून घेणार आहोत तो एक बैलगाडा शैर्यतीतला बैल आहे. आता या ‘राफेल’ बैलाचा बोलबाला का आहे ? तर याचे कारण म्हणजे या बैलाला नुकतीच 19 लाख 41 हजार इतकी किंमत मिळाली आहे. एखाद्या SUV कारपेक्षा जास्त या मैसूर जातीच्या ‘राफेल’ बैलाची किंमत आहे.

बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण अर्थकारणाला गती

ग्रामीण भागात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतींचा धुराळा उडू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा अर्थचक्र सुधारण्यास मदत होत आहे. बैलगाडा शर्यतींना बंदी घातल्यानंतर काहीसं बंद पडलेलं हे अर्थचक्र पुन्हा सुरु झालं आहे. गावागावात खेडोपाडी पुन्हा एकदा जनावरांचे बाजार भरू लागलेत. जनावरांना चांगली किंमतही मिळते आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राफेलचा पंचक्रोशीत डंखा …
पुणे जिल्ह्यातल्या वाडा येथील बैलगाडा मालकाला त्याच्या बैलाच्या विक्रीतून एका SUV कारपेक्षाही जास्त किंमत मिळाली आहे. तब्बल 19 लाख 41 हजार इतकी किंमत मिळाली आहे. खेड तालुक्यातील वाडा येथील शेतकरी अक्षय मुळूक, सिद्धार्थ हुंडारे याच्या राफेल बैलाने शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे. थापलिंग घाटाचा राजा किताबही ‘राफेल’ला मिळाला आहे. त्यामुळे राफेल पंचक्रोशीत चांगलाच प्रसिद्ध आहे.

राफेल ४ महिन्याचा असताना निलेश घनवट यांच्या दावणीतून ऑक्टोबर २०२० मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना दीड वर्षापूर्वी घेतला होता. त्यावेळी बैलाची किंमत ४४ हजार होती. अनेकांच्या मनात या राफेलने घर केले होते. राफेल बैलाचे देखणे रूप व दौड बैलगाडा शौकीन त्याच्यावर खुश होते. राफेलची यापूर्वी प्रथम १० लाखाला मुळूक यांचेकडे मागणी केली होती. परंतु, मुळूक यांनी या व्यवहाराला नकार दिला. त्यानंतर पै. संकेतशेठ आहेर बैलगाडा संघटना (चिखली) व कै. सहादू मामा काळोखे बैलगाडा संघटना (देहूगाव) यांनी तब्बल १९.४१ लाखाला रूपये देऊन बैलाची खरेदी केली आहे. बैलगाडा विश्वात राफेलने मात्र पंचक्रोशीचे नाव गगनाला भिडवले असल्याने राफेलला घेऊन जाताना मात्र पंचक्रोशीतील अनेकांचे डोळे पाणावले होते.