हॅलो कृषी ऑनलाईन : मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची शेतीच्या कामासाठी लगबग सुरु आहे. यंदा मात्र भंडाऱ्यात शिवगामी तांदूळ, कटप्पा तांदूळ, बाहुबलीती धानाचे वाण शेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे. बऱ्याचदा प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील पात्रांची नावं अनेक वस्तुंना देण्याचा ट्रेंड गाजतो आहे. अशातच बाहुबली चित्रपटातील पात्रांच्या नावाचे धानाचे वाण धेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे. बाहुबली, कटप्पा आणि शिवगामीदेवी भंडाऱ्याच्या बाजारात दाखल झाले.
भंडारा जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाची चाहूल लागताच जिल्हाभरातील शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. बी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. यावर्षी मात्र बाजारातील धानाच्या बियाणांची अफलातून आणि विचित्र नावं शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. बाजारात आलेल्या धानाच्या बाहुबली, कटप्पा, शिवगामी ने जिल्ह्यातील शेतकरी आकर्षित होत आहेत. आता जिल्ह्यात या धानाच्या वाहनाचे स्टॉक संपले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अफलातून नावाच्या वाणांच्या धानाची लागवड करतात. भंडारा जिल्हावासिय बाहुबली, कटप्पा आणि शिवगामी नावाचा तांदूळ भविष्यात खाणार आहेत.
दरम्यान या धनाची नावे जरी आकर्षक असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्यांच्या किमतीमध्ये 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर काही वाहनांमध्ये वाढ जास्त झालेली आहे. इंधनाचे दर वाढले आहे त्यामुळे वाहतूक खर्च वाढला त्यामुळे बियाण्यांच्या दरात किंचित वाढ झाली तरी बियाण्यांची अशी प्रसिद्ध आणि अफलातून नाव शेतकऱ्यांचा आकर्षण ठरत आहेत.