हॅलो कृषी ऑनलाईन: सीताफळ (Custard Apple Varieties In India) हे उष्णकटिबंधातील सर्वांच्या आवडीचे फळ आहे. बाजारात जुलै ते ऑगस्टमध्ये येणार्या या फळांचा मुख्य हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत चालतो. आज आपण या फळाच्या अधिक उत्पादन (Custard Apple Production) देणार्या टॉप तीन जातींबद्दल(Custard Apple Varieties In India) माहिती जाणून घेणार आहोत.
सीताफळाच्या टॉप तीन जाती (Custard Apple Varieties In India)
सीताफळाच्या (Custard Apple) प्रामुख्याने 40 ते 50 प्रजाती असून 120 जाती आहेत परंतु लागवडीसाठी ऍनोना स्क्वॅमोसा (Annona squamosa) या प्रकारातील जाती उपलब्ध आहेत.
फुले पुरंदर (Phule Purandar)
- ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 2014 मध्ये महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केली आहे.
- या जातीची फळे आकर्षक व आकाराने मोठे असून वजन 360 ते 388 ग्रॅम आहे.
- झाडावरील फळांची संख्या 118 ते 154 एवढी आहे.
- फळातील गर घट्ट, रवाळ आणि स्वादिष्ट असून गराचे प्रमाण 45 ते 48% आहे.
- फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण 22 ते 24 टक्के आहे एवढे असते.
- या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गरातील पाकळ्या पांढर्या शुभ्र आणि संख्येने अधिक असल्याने या जातीच्या फळांना गरासाठी मागणी आहे.
- फळातील बियांची संख्या 37 ते 40 एवढी आहे. अशा विविध गुणधर्मामुळे सध्या या जातीची लागवड महाराष्ट्रात वाढत आहे.
बाळानगर (Balanagar)
- ही जात आंध्र प्रदेशातील संशोधन केंद्र येथे विकसित केलेली असून फळांचे सरासरी वजन 266 ग्रॅम व गराचे प्रमाण 48% आहे.
- प्रत्येक झाडापासून 40 ते 60 फळे मिळतात.
- फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण 27 टक्के असून बियांचे प्रमाण 3.95% आहे.
अर्का सहन (Arka Sahan)
- ही संकरित जात भारतीय बागवानी संस्था बंगलोर, कर्नाटक येथून विकसित केलेली आहे.
- फळे व आकर्षक गोल, रंग फिकट हिरवा, डोळे पसरट चपटे असतात.
- फळाचे वजन 400 ते 500 ग्रॅम, गराचे प्रमाण 48% आणि विद्राव्य घटकांचे प्रमाण 31 टक्के असल्याने खाण्यास फारच गोड असतात.
- बियांची संख्या फारच कमी असून लहान असतात.
- फळांच्या दोन डोळ्यांमध्ये अंतर कमी असल्याने पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव कमी आढळतो.
- फळे अधिक काळ टिकतात.