हॅलो कृषी ऑनलाईन: हळदीच्या वाढीच्या अवस्थेत पिकाला वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची (Turmeric Nutrient Management) गरज असते. ही गरज पूर्ण न झाल्यास पिकावर दुष्परिणाम दिसून येतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी हळद पिकाच्या (Turmeric Crop) वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्यांचे सुयोग्य नियोजन (Turmeric Nutrient Management) कसे करावे याबाबत सल्ला दिलेला आहे. जाणून घेऊ या सविस्तर.
हळद पिकावरील अन्नद्रव्य व्यवस्थापन (Turmeric Nutrient Management)
- हळद पिकात नत्राची कमतरता असल्यास, युरिया 2% (20 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात) याप्रमाणात पानांवर फवारणी करावी.
- रासायनिक खतांचा प्रभावी वापर (Effective Use Of Chemical Fertilizers) करण्यासाठी नत्र हे अमोनियम सल्फेटद्वारे, स्फुरद डायमोनियम फॉस्फेटद्वारे आणि पालाश सल्फेट ऑफ पोटॅशद्वारे द्यावे.
- रासायनिक खतांचा वापर करताना ती जमिनीवर फोकून देऊ नयेत त्याऐवजी जमिनीत पेरून मातीत मिसळून द्यावीत.
- हळद पिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (Micronutrient For Turmeric Crop) वापर माती परिक्षणाच्या आधारावर करावा. लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य फेरस सल्फेटद्वारे, जस्त हे झिंक सल्फेटद्वारे आणि बोरॉन हे बोरॅक्सद्वारे जमिनीत सेंद्रिय खतात मिसळून द्यावे.
- हळदीच्या पावडरला गर्द पिवळा रंग येण्यासाठी कर्क्यूमिन (Curcumin In Turmeric) हा प्रमुख घटक महत्त्वाचा असतो. आहे. कर्क्यूमिनचे प्रमाण वाढविण्यासाठी पुरेसे सल्फर म्हणजेच गंधकाचे प्रमाण महत्वाचे आहे.
- हळदीच्या पानांमध्ये लोहाची कमतरता असल्यास पाने पिवळी पडल्यास (Yellowing Of Turmeric Leaves) फेरस अमोनियम सल्फेट किंवा फेरस सल्फेट 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून 3 ते 4 वेळा फवारणी करावी (Turmeric Nutrient Management).
- फवारणीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खते चिलेटेड स्वरुपात (Chelated Micronutrients) असल्यास उपलब्धता वाढते. चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचे फवारणीचे प्रमाण 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे शिफारस करण्यात आलेले आहे.
- फवारणीसाठी शासन-प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड-2 किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी निर्मित द्रवरूप फुले मायक्रो ग्रेड-2 यांचा वापर्व करावा.