Turmeric Rate : शेतकऱ्याच्या शेतातील पिवळ सोनं म्हणून हळदीला ओळखाल जात. सध्या बरेच शेतकरी (Farmer) हळदीच्या पिकाचे उत्पन्न घेताना दिसत आहेत. दरम्यान, जिंतुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Jintur Agricultural Produce Market Committee) आवारात मंगळवारी झालेल्या लिलावात हळदीला 10 हजार 100 रुपये प्रती क्विंटल असा उच्चांकी दर मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यात मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यानी हळद लागवडीकडे कल वाढलेला आहे . हळद पिक घेताना मोठ्या प्रमाणात लागवड पासुन ते खते फवारणी याच्यावर मोठा खर्च करावा लागतो. त्याचबरोबर उत्पादन झालेल्या हळदीला कवडीमोल दर मिळत होता . यामुळे झालेला खर्च निघनेही अवघड होऊन बसले होते. (Turmeric Rate )
यावर्षी शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवली होती. परंतु मंगळवार 11 जुलै रोजी बाजार समितीच्या आवारात पहिल्यांदाच मागील दोन वर्षांपूर्वीच्या दरा पेक्षा उच्चांकी 10 हजार 100 रुपये भाव मिळाला आहे. या लिलावात किमान 7 हजार 660 रुपये तर सरासरी 9 हजार 400 रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव मिळाला आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव चेक करायचंय मात्र कुठे चेक करू हे समजत नाही? तर मग चिंता करू नका. तुम्ही लगेच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला रोजच्या बाजारभावाची माहिती मिळेल त्याचबरोबर जमीन मोजणी, जमीन खरेदी विक्री, हवामान अंदाज, सरकारी योजना इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल. त्यामुळे लगेचच आपले Hello Krushi चे मोबाईल अँप डाउनलोड करा
दरम्यान, हळदीला उच्चांकी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हळदीला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे हळदीला दर मिळाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
शेतमाल : हळद/ हळकुंड
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
12/07/2023 | ||||||
हिंगोली | — | क्विंटल | 2645 | 9000 | 10350 | 9675 |
वाशीम – अनसींग | हायब्रीड | क्विंटल | 600 | 8850 | 9400 | 9000 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 4 | 6000 | 12000 | 9000 |
हिंगोली- खानेगाव नाका | लोकल | क्विंटल | 46 | 8500 | 9000 | 8750 |
जिंतूर | नं. १ | क्विंटल | 51 | 8500 | 9150 | 8726 |