हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात वनाचे क्षेत्र (Vasantrao Naik Harit Maharashtra Abhiyan) वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या (Maharashtra Government) वतीने वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत पावसाळ्यात वृक्ष लागवड (Tree Plantation Campaign) मोहीम राबवण्यात येत आहे. सर्वाधिक वृक्ष लागवड व संवर्धन (Plantation and Conservation Of Trees) करणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत (Vasantrao Naik Harit Maharashtra Abhiyan) लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 46 लाख 58 हजार 768 एवढ्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
तालुका स्तरावर दर महिन्यास सर्वाधिक वृक्ष लागवड करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. जिल्हा परिषद स्तरावर दर महिन्यास सर्वाधिक वृक्ष लावणाऱ्या ग्रामपंचायतींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान होणार आहे (Vasantrao Naik Harit Maharashtra Abhiyan).
तसेच जिल्हा स्तरावर डिसेंबर अखेरीस संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक वृक्ष लागवड व संवर्धन करणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सन्मान होणार आहे.
निवडीसाठी निकष काय आहेत? (Vasantrao Naik Harit Maharashtra Abhiyan)
या अभियानासाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत ते खालील प्रमाणे
- किमान नऊ महिन्यांच्या रोपांचा वापर करावा.
- ट्री कॉरिडॉर, मियावाकी व बिहार पॅटर्न पद्धतीने आणि सर्वाच्या सहभागातून लागवड करावी.
- संवर्धनासाठी वृक्षांना कुंपण, जाळी लावावी.
- संवर्धनाचे प्रमाण शंभर टक्के असावे.
- पाण्याची यथायोग्य व्यवस्था असावी.
- वृक्षांना क्रमांक द्यावेत.
- लागवड व संगोपनासाठी (Vasantrao Naik Harit Maharashtra Abhiyan) नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत.
- ग्रामपंचायतीत वृक्ष लागवडीचे रेकॉर्ड ठेवलेले असावे.