महाराष्ट्र गारठला ! ‘या’ जिल्ह्यात हंगामातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Report
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंड वारे आणि महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. मंगळवारी जळगाव येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज दिनांक 22 रोजी राज्यात गारठा कायम राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्र गारठला

गेले काही दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सह मराठवाड्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान 10 अंश व त्यापेक्षा खाली घसरले असून जळगाव गडचिरोली अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ येथे थंडीची लाट आली असून विदर्भात लाटेची तीव्रता अधिक आहे. राज्याच्या किमान तापमानात मोठी घट झाल्याने हुडहुडी वाढली आहे.

कमाल तापमानाचा विचार करता राज्याच्या बहुतांश भागात 28 अंश यापेक्षाही हे तापमान खाली आले आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कमी होऊन हवेत गारठा वाढला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे सर्वाधिक 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हिमालयातील हिमवृष्टीचा परिणाम

या दरम्यान बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्रात असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकून जाणार आहे. पश्‍चिमी चक्रावात त्यामुळे हिमालयात होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर आणि वायव्य भारतात थंडीची लाट आली आहे. सोमवारी मध्ये प्रदेशातील नौगाव इथ देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 1.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब हरियाणा चंदिगड दिल्ली राजस्थान मध्य प्रदेशसह उत्तरेकडील राज्यांमध्ये तीव्रता कमी अधिक होत आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड बिहार ओरिसा मध्ये थंड दिवस अनुभवायला मिळत आहेत.