उत्तर भारतातील थंडीची लाट कमी होणार, महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट कायम आहे. बुधवारी दिनांक 22 रोजी जळगाव येथे नीचांकी 7.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 23 रोजी राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मराठवाड्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान 10 अंश किंवा त्यापेक्षा पारा खाली घसरला आहे. सध्या किमान तापमानात किंचित वाढ होत असली तरी बुधवारी जळगाव अमरावती यवतमाळ येथे थंडीची लाट कायम होती. दिवसाच्या कमाल तापमानातही चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे. कोकण वगळता उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान 29 अंशच्या खाली आले आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कमी झाल्यानं हवेत गारठा जाणवत आहे. बुधवारी दिनांक 22 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रुज तिथं सर्वाधिक 32.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट कमी होणार

पश्‍चिमी चक्रावात यामुळे हिमालयात होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर आणि वायव्य भारतात आलेली थंडीची लाट कमी झाली आहे. बुधवारी दिनांक 22 रोजी हरियाणातील हिस्सार इथं देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 23 उत्तर भारतात थंडीची लाट ओसरण्याची शक्यता आहे.