महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पाऊसाची शक्यता; पहा हवामान अंदाज काय सांगतोय..

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात वाढलेली हुडहुडी कमी झाली आहे. विदर्भ मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट ओसरली आहे. शुक्रवारी दिनांक 24 रोजी निफाड इथं नीचांकी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज दिनांक 25 रोजी किमान तापमान वाढ होऊन गारठा कमी होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेले काही दिवस किमान तापमानात वेगाने घट झालेल्या विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात किमान तापमान दहा अंशांच्या खाली आलं होतं.

मात्र उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट ओसरल्यानंतर राज्यातही गारठा कमी झाला. दिवसाच्या कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच आहे शुक्रवारी दिनांक 24 सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर येथे सर्वाधिक 32.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात मंगळवारपासून पावसाची शक्यता

राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्‍यता असल्याने थंडी कमी होणार आहे. तर बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पावसाला पोषक हवामान होणार असल्याने सोमवारी विदर्भात तुरळक ठिकाणी तर मंगळवारपासून विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

शेतकरी कर्जमाफी बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले? विधानसभेत झाली महत्वाची चर्चा