हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा आला की सर्वत्र मक्याची कणसे दिसायला लागतात. कणसाला विशेष मागणी देखील असते. आजच्या लेखात आपण एका अशा शेतकऱ्याविषयी जाणून घेणार आहोत ज्या शेतकऱ्याने चक्क घराच्या टेरेसवर रंगीत कणसाची लागवड केली आहे. या मक्याच्या दाण्यांना ‘रेनबो कॉर्न’ असे म्हणतात.
केरळमधील मल्लापुरममध्ये अब्दुल रशीद नावाचा शेतकरी राहतो त्याने आपल्या घराच्या छतावर रंगीत कणसाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. ही कणसे केवळ दिसायलाच छान नाहीयेत तर त्याची चव देखील दर्जेदार आहे. मक्याच्या कणसावर इंद्रधनुष्याप्रमाणे छटा आहेत. हे रंगीबेरंगी कणीस तुम्ही पाहिले तर तर त्याच्या वरची साल साध्या मक्याच्या कणसाप्रमाणे दिसते. जेव्हा तुम्ही त्या कनसाची साल काढता तेव्हा त्याच्या आतील दाणे रंगीबेरंगी दिसतात, रेनबो कॉर्न हे पीक सर्वात पहिल्यांदा थायलंड मध्ये दिसले. केरळ मध्ये अब्दुल रशीद ने आपल्या फार्म हाऊस च्या छतावर ड्रॅगन फ्रुट सारखे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले आहे.या प्रकारचे कणीसाची चव साध्या मक्याप्रमाणेच लागते, केरळमध्ये अशा प्रकारच्या मक्याचे उत्पादन पहिल्यांदाच घेतले गेले आहे असे अब्दुल रशीद यांनी सांगितले आहे तसेच मला अजून ४ प्रकारच्या मक्याचे उत्पादन घेण्यास रस आहे असेही त्यांनी सांगितले आहे
रशीद कडून अभ्यासाकरिता विविध देशांना भेटी
त्याचप्रमाणे या कणसांची वाढ होईल भरपूर सूर्यप्रकाशाची गरज लागते.या कणसांची वाढ ५० दिवसात पूर्णपणे होते तसेच एका झाडाला ३ कणसे लागतात एवढेच नाही तर रशीद ४० प्रकारच्या फळांची शेती सुद्धा करतो. रशीद ने फळांचा व बियांचा अभ्यास करण्यासाठी इंडोनेशिया, थाईलँड, मलेशिया, चीन, सिंगापुर आणि श्रीलंकेला या देशांना भेट दिली आहे.